सानिकाच्या खोट्या प्रेग्नंसीचं सत्य येणार समोर; दिपू घेणार महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:09 IST2022-05-18T15:08:34+5:302022-05-18T15:09:07+5:30
Man udu udu Jhala: कार्तिकसोबत लग्न व्हावं यासाठी सानिका खोट्या प्रेग्नंसीचं नाटक करते. परंतु, तिचं हे नाटक आता दिपूसमोर उघड होणार आहे.

सानिकाच्या खोट्या प्रेग्नंसीचं सत्य येणार समोर; दिपू घेणार महत्त्वाचा निर्णय
छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका आतापर्यंत अनेक विविध कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. या मालिकेत दररोज येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. यामध्येच कार्तिकसोबत लग्न व्हावं यासाठी सानिका खोट्या प्रेग्नंसीचं नाटक करते. परंतु, तिचं हे नाटक आता दिपूसमोर उघड होणार आहे.
सानिका प्रेग्नंट असल्याचं समजून देशपांडे सर आणि आई, सानिकाच्या चोरी ओटीचा कार्यक्रम ठेवतात. या कार्यक्रमात कार्तिकला फोन न केल्यामुळे सानिका प्रथम रुसून बसली होती. मात्र, दिपूने समजूत काढल्यानंतर ते या कार्यक्रमासाठी देशपांडे सरांच्या घरी गेले. मात्र, या पूजेच्यावेळी सानिका नकळतपणे पपई खाते आणि तिचं बिंग सगळ्यांसमोर उघड होतं. सानिकाने पपई खाल्ल्यामुळे घरातले सगळे जण तिला तातडीने दिपूसोबत हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी पाठवतात. मात्र, यावेळी ती आई होणार नसल्याचं उघड होतं.
दरम्यान, दिपू आणि सानिका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर सानिकावर चिडतात जे पाहून दिपू चेकअप रुममध्ये येते आणि काय झालं असं विचारते. त्यावर सानिका प्रेग्नंट नाही ती खोटं बोलतीये असं डॉक्टर दिपूला सांगतात. हे सत्य ऐकल्यावर दिपू काही काळासाठी स्तब्ध होते. मात्र, सानिकाचं हे सत्य ती घरातल्यांना सांगेल का? की पुन्हा सानू तिला शब्दांच्या जाळ्यात अडकवेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.