'मन उडू उडू झालं'मधील दिपू उर्फ हृता दुर्गुळेने मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आले मोठे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:03 IST2022-03-29T18:02:59+5:302022-03-29T18:03:27+5:30
Hruta Durgule:अभिनेत्री हृता दुर्गुळे 'मन उडू उडू झालं' मालिकेत दिपूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे.

'मन उडू उडू झालं'मधील दिपू उर्फ हृता दुर्गुळेने मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आले मोठे कारण
झी मराठीवर सुरू असलेली मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. या मालिकेमध्ये इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला दिपूच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पाहायला मिळते आहे, तर इंद्राची भूमिका अजिंक्य राऊतने केली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी केले आहे. या मालिकेत देशपांडे कुटुंबामध्ये शलाका, सानिका, दीपिका या तीन मुली आहेत, तर या मालिकेत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आता समजते आहे की हृता दुर्गुळे हिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. यामागचे कारणदेखील समोर आले आहे.
हृता दुर्गुळे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि नाटकात देखील काम केले आहे. ती काम करत असलेल्या मालिका सुपरहिट ठरतात. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देखील देत असते आणि आपले फोटो देखील शेअर करत असते. आता हृता दुर्गुळे हिनेदेखील या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे सांगण्यात येते.मात्र काही जणांनी असे सांगितले आहे की, तिने ही मालिका सोडली आहे.
मात्र तिने मालिका सोडली नाही. तर तिने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला आहे. ती सध्या व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. ती हृषिकेशला फिरण्यासाठी गेली आहे. त्यामुळे तिने मालिकेच्या शूटिंग मधून फक्त काही दिवसांची सुट्टी घेतली आहे. तर हृताने ही ट्रीप एन्जॉय करतानाचे काही व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळचे आहे.