परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:41 IST2024-10-22T14:40:24+5:302024-10-22T14:41:12+5:30

'मन उधाण वाऱ्याचे' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई

man udhan varyache fame actress neha gadre pregnant shared good news become mother soon | परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

'मन उधाण वाऱ्याचे' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक. स्टार प्रवाहवरील या मालिकेतून अभिनेत्री नेहा गद्रे घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धीझोतात आणलं. नेहाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नेहाने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. नेहा गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली आहे. 

नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. या व्हिडिओत तिच्या पतीबरोबर ती समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. या व्हिडिओत नेहाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बेबी बंपही फ्लाँट केल्याचं पाहायला मिळत आहे. नेहाच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 


'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा अजूनही चांदरात आहे मालिकेत दिसली होती. मोकळा श्वास, गडबड झाली या सिनेमांतही तिने काम केलं होतं. २०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दुरावली. मात्र तिने परदेशात राहून एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. दोन वर्षे तिने अभ्यास आणि मेहनत करून डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली. आता लग्नानंतर ५ वर्षांनी नेहा आई होणार आहे. 

Web Title: man udhan varyache fame actress neha gadre pregnant shared good news become mother soon