'मन धावतंया...' फेम सिंगर राधिका भिडेची मालिकेत एन्ट्री, सावलीसोबत रेकॉर्ड करणार गाणं, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:27 IST2026-01-30T13:25:38+5:302026-01-30T13:27:29+5:30

काही दिवसांपूर्वी 'मन धावतंया...' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यामुळे सिंगर राधिका भिडे हिला प्रसिद्धी मिळाली. आता राधिकाची झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. राधिका 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत दिसणार आहे. 

Man Dhavatanya' fame singer Radhika Bhide's special entry in savlyachi janu savali serial | 'मन धावतंया...' फेम सिंगर राधिका भिडेची मालिकेत एन्ट्री, सावलीसोबत रेकॉर्ड करणार गाणं, प्रोमो समोर

'मन धावतंया...' फेम सिंगर राधिका भिडेची मालिकेत एन्ट्री, सावलीसोबत रेकॉर्ड करणार गाणं, प्रोमो समोर

सोशल मीडियावर रोज गाण्यांचा ट्रेंड बदलत असतो. काही दिवसांपूर्वी 'मन धावतंया...' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यावरच्या काही रील्सही व्हायरल झाल्या होत्या. या गाण्यामुळे सिंगर राधिका भिडे हिला प्रसिद्धी मिळाली. राधिकाच्या या गाण्याला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं. त्यानंतर राधिका पॉपस्टार या शोमध्येही दिसली होती. आता राधिकाची झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. राधिका 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत दिसणार आहे. 

'सावळ्याची जणू सावली' मालिकेने रंजक वळण घेतलं आहे. सावलीच्या आवाजामागचं सत्य समोर आल्यानंतर सावली आता तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. हे पहिलं गाणं सावली गायिका राधिका भिडेसोबत रेकॉर्ड करणार असल्याचं मालिकेत दाखवलं आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की सावली तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओमध्ये पोहोचते. तिथे राधिका भिडेची एन्ट्री होते. राधिकाला पाहून सावलीचा आनंद गगनात मावत नाही. राधिकासोबत पहिलं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी सावली उत्सुक आहे. 


मात्र सावलीच्या या पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये भैरवी घोळ घालत असल्याचं दिसत आहे. ती सावलीचं हे गाणं खराब करण्यास सांगते. आता 'सावळ्याची जणू सावली' मालिका पुन्हा कोणतं वळण घेणार? सावलीचं गाणं खराब करण्यात भैरवी यशस्वी होणार का? की भैरवीचा डाव तिच्यावरच उलटणार हे पाहावं लागेल. 

Web Title : 'मन धावतंया...' फेम सिंगर राधिका भिडे सीरियल में, गाना रिकॉर्ड किया।

Web Summary : 'मन धावतंया...' से मशहूर राधिका भिडे 'सावळ्याची जणू सावली' में सांवली के साथ गाना रिकॉर्ड करने के लिए एंट्री करती हैं। प्रोमो में सांवली उत्साहित है, लेकिन भैरवी तोड़फोड़ की साजिश रचती है। क्या सांवली का गाना सफल होगा?

Web Title : 'Man Dhavataya...' singer Radhika Bhide enters serial, records song.

Web Summary : Radhika Bhide, famed for 'Man Dhavataya...', enters 'Savalyachi Janu Savli' to record a song with Savli. A promo shows Savli's excitement, but Bhairavi plots sabotage. Will Savli's song succeed?