Video : ...अन् झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात फॅशन दिवा मलायकाची एन्ट्री, श्रेया बुगडे दिसताच काय केलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:48 IST2023-10-21T11:48:17+5:302023-10-21T11:48:46+5:30

ऐन पन्नाशीतही फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मलायका अरोराने झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

malaika arora at zee marathi awards 2023 actress said hello to shreya bugde video viral | Video : ...अन् झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात फॅशन दिवा मलायकाची एन्ट्री, श्रेया बुगडे दिसताच काय केलं पाहा

Video : ...अन् झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात फॅशन दिवा मलायकाची एन्ट्री, श्रेया बुगडे दिसताच काय केलं पाहा

सध्या सर्वत्र झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्याची चर्चा सुरू आहे. यंदाचा झी मराठी अवॉर्ड सोहळा अनेक कारणांमुळे खास असणार आहे. या अवॉर्ड सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराही हजेरी लावणार आहे. अवॉर्ड सोहळ्याचा शूटिंग दरम्यानचा मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

ऐन पन्नाशीतही फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मलायका अरोराने झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी मलायकाने खास लूक केला होता. सोनेरी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूकमध्ये मलायका झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्याला पोहोचली. मलायकामुळे या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लागले, असंच म्हणावं लागेल. वुम्पला या पापाराझी पेजवरुन मलायकाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओत मलायका एन्ट्री घेत असतानाच तिला अभिनेत्री श्रेया बुगडे दिसते. श्रेयाला बघताच मलायका थांबते, मागे वळून बघते आणि तिला गोड स्माइल देत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच मलायका श्रेया बुगडेला हॅलोदेखील म्हणताना दिसत आहे.  झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातील मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात मलायका अरोराबरोबरच धक धक गर्ल माधुरी दीक्षितही हजेरी लावणार आहे. त्यामुळे यंदाचा पुरस्कार सोहळा खऱ्या अर्थाने खास असणार आहे.

Web Title: malaika arora at zee marathi awards 2023 actress said hello to shreya bugde video viral