ढोल बजने लगा गाण्यावर लाल रंगाच्या घागऱ्यात थिरकली मलायका अरोरा, डान्स बघणारे झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:29 IST2021-03-10T17:04:50+5:302021-03-10T17:29:44+5:30
मलायका अरोरा एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली.

ढोल बजने लगा गाण्यावर लाल रंगाच्या घागऱ्यात थिरकली मलायका अरोरा, डान्स बघणारे झाले थक्क
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ४७ वर्षीय मलायका अरोरा नेहमी इव्हेंट्स किंवा एअरपोर्टवरील वेगवेगळ्या लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. इतकेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस आणि अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते. अलीकडेच मलायका अरोरा एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली. इथं मलायकाने तिच्या जबरदस्त डान्सिंग मूव्हज दाखवत सगळ्यांना थक्क केलं. 'ढोल बाजने लगा' या गाण्यावर डान्स रिअॅलिटी शो दरम्यान मलायका कोरियोग्राफर टेरेन्स लुईसबरोबर डान्स केला होता. या दरम्यान मलायका आणि टेरेंसची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती.
या गाण्यावर मलायकासोबत परफॉर्म करण्यापूर्वी कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने कोरिओग्राफर गीता कपूरला खास विनंती केली. टेरेंसने गीता कपूरला तिचे आणि मलायकाला गण्यामधील मूव्हस शिकवण्यास सांगितले, ज्यावर गीताने मलायकाला स्टेजवर येऊन काही स्टेप्स समजावल्या.
मलायकाची डान्स मूव्हस पाहिल्यानंतर शोमध्ये उपस्थित सर्व स्पर्धकांनी उभ्या जागी डान्स सुरुवात केली. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ३४ हजारांहून अधिक वेळा लाईक्स मिळाले आहेत.