'नवा गडी नवं राज्य' नंतर अनिता दाते झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत; प्रोमोमध्ये दिसली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 15:58 IST2024-02-17T15:57:01+5:302024-02-17T15:58:48+5:30
लवकरच कलर्स मराठी या वाहिनीवर 'इंद्रायणी' ही मालिका सुरु होणार आहे.

'नवा गडी नवं राज्य' नंतर अनिता दाते झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत; प्रोमोमध्ये दिसली झलक
Indrayani New Serial : कलर्स मराठी या वाहिनीवर 'इंद्रायणी' ही नवी कोरी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतील रमाची भूमिका तिने यशस्वीरित्या साकारली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक झाले. दरम्यान, आता अनिता दाते लवकरच कलर्स मराठीवरील एका नव्या कोऱ्या मालिकेत काम करताना दिसणार आहे. ती 'इंद्रायणी' या मालिकेत दिसणार आहे. याबाबत अनितानेच पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
टीआरपीच्या शर्तीत मराठी वाहिन्यांवर नवनव्या मालिका सुरु होत आहेत. त्यात आता कलर्स मराठीवरील इंद्रायणी देखील आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत संदीप पाठकसह ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते ही फ्रेश जोडी चाहत्यांच्या समोर येतेय.
येत्या २५ मार्चपासून ही मालिका प्रसारित होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत बालकलाकार सांची भोईर देखील झळकणार आहे. शिवाय मालिका नेमकी कोणत्या वेळेत प्रसारित केली जाणार आहे, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. त्यामुळे 'इंद्रायणी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.