Video : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये यश-नेहाचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रार्थनाच्या नवऱ्याने केली कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 17:59 IST2022-10-16T17:54:44+5:302022-10-16T17:59:08+5:30
Majhi Tujhi Reshimgath : आता पुन्हा एकदा यश व नेहा सगळे मतभेद विसरून एकत्र आले आहेत. नुकतंच दोघांवर एक रोमॅन्टिक गाणंही शूट करण्यात आलं. सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे.

Video : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये यश-नेहाचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रार्थनाच्या नवऱ्याने केली कमेंट
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिका आली आणि तुफान लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) मालिकेतील रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली. सध्या या मालिकेत यश आणि नेहा अर्थात श्रेयस आणि प्रार्थनाचा रोमॅन्टिक ट्रॅक पाहायला मिळतोय. मध्यंतरी यश-नेहाच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं मालिकेमध्ये पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा यश व नेहा सगळे मतभेद विसरून एकत्र आले आहेत. नुकतंच दोघांवर एक रोमॅन्टिक गाणंही शूट करण्यात आलं. सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे.
होय, या गाण्यातील यश व नेहाचा रोमान्स चर्चेचा विषय ठरत आहे. याची एक झलक प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. या व्हिडीओत प्रार्थना व श्रेयस ‘तुझे कितना चाहने लगे हम’ या हिंदी गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर यानेही या रोमँटिक व्हिडीओवर कमेंट केली आहे.
‘लव्ह यू’ अशी कमेंट त्याने केली आहे. अभिषेकच्या या कमेंटला प्रार्थनानेही उत्तर देत, ‘लव्ह यू टू’ असं म्हटलं आहे.
प्रेक्षकांनीही या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तुमची जोडी चित्रपटात कधी दिसणार? अशी विचारणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र प्रेक्षकांच्या मागणीमुळे मालिका पुन्हा एकदा सुरू झाली.