“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात…" ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 14:13 IST2022-10-29T14:09:22+5:302022-10-29T14:13:10+5:30

प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत 14 नोव्हेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

Majhi tujhi reshimgath fame marathi actress Prarthana Behere post viral | “जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात…" ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाची पोस्ट चर्चेत

“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात…" ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाची पोस्ट चर्चेत

'माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere ) ही सर्वांची आवडती अभिनेत्री. सोशल मीडियावरचे तिचे फोटो, व्हिडीओ, रिल्स क्षणात व्हायरल होतात, ते त्यामुळेच. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असलेल्या मराठी सेलिब्रिटींच्या यादीत प्रार्थनाचं नावही आहेच. सध्या तिचीच चर्चा आहे. होय, प्रार्थनाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सेलिब्रेटींना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना ही करावा लागतो. अनेकदा अभिनेत्रीने तू आई कधी होणार हा प्रश्न हमखास विचारला जातो. यावरच प्रार्थानने तिच्या पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या भाष्य केलं आहे. प्रार्थनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक रस्त्यावरील एका बोर्डचा फोटो पोस्ट केला आहे. 

“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात तेव्हा खरं तर तुम्ही २० वर्षींच्या असता. पण त्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात”, असे त्यावर लिहिलेलं आहे. हा फोटो पोस्ट करत तिने हे अगदी खरंय असं म्हटलं आहे.

प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत 14 नोव्हेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली. डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केलं.
 

Web Title: Majhi tujhi reshimgath fame marathi actress Prarthana Behere post viral