'जागो मोहन प्यारे'मध्ये मैथिली साकारणार परीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:30 IST2018-08-28T12:18:27+5:302018-08-29T06:30:00+5:30

छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जागो मोहन प्यारे'. ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे.

Maithili play angel role in 'Jago Mohan Pyare' | 'जागो मोहन प्यारे'मध्ये मैथिली साकारणार परीची भूमिका

'जागो मोहन प्यारे'मध्ये मैथिली साकारणार परीची भूमिका

ठळक मुद्दे 'जागो मोहन प्यारे' मध्ये मैथिली हि छोट्या परीची भूमिका साकारणार आहेमैथिलीने याआधी पिप्सी आणि सायकल सिनेमांमध्ये अभिनय केला आहे

छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जागो मोहन प्यारे'. ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावली आहे. मोह्हनSSSSS असं म्हणणाऱ्या श्रृती मराठेने साकारलेली मोहिनी व भानू आणि तिच्या मालकाच्या भूमिकेतील अतुल परचुरे रसिकांच्या मनात घर करुन गेले आहेत. मालिकेचे कथानकही तितकंच रंजक आणि विनोदी आहे.

सध्या मालिकेत भानू आणि मोहन यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशातच मोहनच्या आयुष्यात एक नवीन परी येणार आहेत म्हणजेच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. ही परी मोहिनी नसून एक छोटी परी आहे. या छोट्या परीची भूमिका बालकलाकार मैथिली पटवर्धन साकारणार आहे. मैथिली याआधी पिप्सी आणि सायकल या मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 'जागो मोहन प्यारे' मधून मैथिली हि छोट्या परीच्या लाघवी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. आगामी भागांचे कथानक हे छोट्या परीभोवती फिरणार आहे. शोभा मोहनला बाजारातून फुलं आणायला सांगते आणि मोहन बाजारातून येताना फुलं आणतो त्यात हि छोटी परी असते. त्यामुळे छोट्या परीचा एकूणच अवतार एका छान फुलासारखा आहे. भानू या छोट्या परीला सर्वात पहिलं पाहते. आता ही छोटी परी मोहनच्या आयुष्यात काय बदल घडवणार हे पाहणं रंजक ठरेल.

 

Web Title: Maithili play angel role in 'Jago Mohan Pyare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.