फॅमिलीसह हॉलिडे एन्जॉय करतेय माही विज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:16 IST2017-04-19T11:44:17+5:302017-04-19T17:16:01+5:30
टीव्ही कलाकरा वर्षभर मालिकेचे शूटिंग करण्यात बिझी असतात.मात्र सध्या व्हॅकेशन सुरू झाल्यामुळे आपल्या कुटुंबासह परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. ...

फॅमिलीसह हॉलिडे एन्जॉय करतेय माही विज
ट व्ही कलाकरा वर्षभर मालिकेचे शूटिंग करण्यात बिझी असतात.मात्र सध्या व्हॅकेशन सुरू झाल्यामुळे आपल्या कुटुंबासह परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. टीव्ही अभिनेत्री माही विजने मात्र व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी परदेशात जाण्यापेक्षा पुण्याची निवड केली आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासह पुण्यात एका रिसॉर्टमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.काही दिवासांपुर्वीच माहीने सोशल मीडियावर तिच्या व्हॅकेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माही पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत असून भाची खुशीला तिने कडेवर घेत फोटो काढण्यात बिझी दिसतेय.याव्यतिरिक्त माहीने काही फोटोज पोस्ट केलेय ज्यामध्ये ती भाच्यासोबत पोज देताना दिसतेय. माही विज ही टीव्ही अभिनेता जय भानुशालीची पत्नी आहे.माहीने छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका करत रसिकांना फुल ऑन एंटरटेन केले आहे. माहीने 'बालिका वधू' 'लागी तुझसे लगन' 'अकेला' 'तेरी मेरी लव स्टोरीज' आणि 'एनकाउंटर' सारख्या मालिकांमध्ये झळकली होती, तसेच ती डान्सिंग रियलिटी शो 'झलक दिखला जा सीजन 4' आणि नच बलिए 5 मध्येही ती सहभागी झाली होती.गेल्या काही महिन्यांपासून माहीचे आणि जय भानूशाली दोघांमध्ये खडके उडत असल्याच्या बातम्या येत होत्या. इतकेच नसून ती जयसह घटस्फोटही घेणार होती अशा अफवा पसरत होत्या. सततच्या या बातम्यांमध्ये चर्चेत राहण्यापेक्षा तिने दोघांमध्ये सगळे सुरळीत असून बातम्यांमध्ये येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असे स्पष्टीकरण दिले होते.त्यानुसार सध्या दोघेही आपल्या आयुष्यात संसारात रमले आहेत.वेळेत वेळ काढून सध्या माही व्हॅकेशन एन्जॉय करतेय.
![]()