"मला माझ्या मुलांवर...", जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माही विजची पहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:50 IST2026-01-05T11:50:01+5:302026-01-05T11:50:35+5:30
घटस्फोट घेत विभक्त झाल्याची घोषणा जय आणि माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माहीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

"मला माझ्या मुलांवर...", जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माही विजची पहिली पोस्ट
टेलिव्हिजनचं लोकप्रिय कपल जय भानुशाली आणि माही विज घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. लग्नानंतर १४ वर्षांनी जय आणि माहीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. घटस्फोट घेत विभक्त झाल्याची घोषणा जय आणि माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माहीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
माहीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की "लोकांचा विश्वास बसेल असं चांगलं मन आणि ऊर्जा देणारं व्यक्तिमत्त्व बना. चांगली व्यक्ती होण्यापासून कधीही स्वत:ला थांबवू नका". माही दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणते, "मला माझ्या मुलांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आवडतात. त्यांच्यासाठी माझ्या हृदयात स्पेशल जागा नेहमीच असेल".

जय आणि माही यांनी एकाच मालिकेत काम केलं होतं. तिथेच त्यांचे सूर जुळले. त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांना तारा ही गोंडस मुलगी आहे. तर खुशी आणि राजवीर या दोन मुलांना त्यांनी दत्तक घेतलं आहे.