घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ९ वर्षांनी माही विजचं मालिकाविश्वात पुनरागमन! 'सहर होने को है'मधून भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:56 IST2025-11-06T14:55:27+5:302025-11-06T14:56:29+5:30
Mahi Vij : टीव्ही अभिनेत्री माही विजने तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिले आहे. माही विज तब्बल ९ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहे.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ९ वर्षांनी माही विजचं मालिकाविश्वात पुनरागमन! 'सहर होने को है'मधून भेटीला
टीव्ही अभिनेत्री माही विज आणि जय भानुशाली गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी ही बातमी आली होती की, हे जोडपे बऱ्याच काळापासून वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहे. मात्र, माही विजने या बातम्यांना पूर्णविराम लावला. आता माही विजने तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिले आहे. माही विज तब्बल ९ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहे.
माही विजच्या नवीन व्लॉगमध्ये तिने सांगितले की, तिने कलर्स टीव्हीच्या 'सहर होने को है' या मालिकेचं शूटिंग सुरू केलं आहे. तसेच, जय नुकताच जपान दौऱ्यावरून तिच्यासाठी जे गिफ्ट घेऊन आला, तेदेखील तिने दाखवले. माही म्हणाली, "हा पहिला दिवस आहे आणि मी पुन्हा शूटिंगसाठी खूप उत्सुक आहे. मला जेव्हा कामाची गरज होती, तेव्हा मला काम मिळालं याचा मला आनंद आहे. मला सेटवर परत जायचं होतं. आता प्रतीक्षा संपली आहे, तुमची 'नकुशा' परत आली आहे."
२०११ मध्ये झाले होते दोघांचे लग्न
'सहर होने को है' या मालिकेत माही एका तरुण मुलीच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचं शूटिंग लखनऊ येथे सुरू आहे. व्लॉगमध्ये माहीने सांगितलं की, जय तिच्यासाठी जपानमधून क्रिश्चियन डिओरची लिपस्टिक घेऊन आला आहे. माही आणि जय एका दशकाहून अधिक काळ एकत्र आहेत. या जोडप्याने २०११ मध्ये लग्न केले. त्यांना तारा, खुशी आणि राजवीर अशी तीन मुले आहेत. राजवीर आणि खुशीला त्यांनी दत्तक घेतले आहे.