n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कवच या मालिकेद्वारे अभिनेत्री महेक चहल छोट्या पडद्यावर आगमन करणार होती. पण मालिका सुरू होण्यापूर्वी महेकने ही मालिका सोडली आहे. काही दिवसांपूर्वी महेकचा अपघात झाला असून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिला अजिबातच चालायला जमत नसल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर अपघातानंतरही ती चित्रीकरणासाठी गेली होती. पण तिला अतिशय वेदना होत असल्याने तिला चित्रीकरण करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मालिका सोडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. महेकला झालेल्या अपघातामुळे बालाजी टेलिफ्लिमस्ची चांगलीच पंचाईत झाली आहे. मालिका सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक असल्याने महेकच्या रिप्लेसमेंटची शोधाशोध सध्या जोरात सुरू आहे.