'हास्यजत्रा'च्या त्रिकुटाचा 'सुंदरी सुंदरी' गाण्यावर धमाल डान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:35 IST2025-10-10T13:34:53+5:302025-10-10T13:35:27+5:30
Maharashtrachi Hasyajatra Show : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले कलाकार निखिल बने, श्रमेश बेटकर आणि मंदार मांडवकर हे केवळ स्टेजवरच नाही, तर सोशल मीडियावरही आपल्या चाहत्यांना खळखळून हसवत असतात. नुकताच या तिघांनी इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला असून, तो तुफान व्हायरल होत आहे.

'हास्यजत्रा'च्या त्रिकुटाचा 'सुंदरी सुंदरी' गाण्यावर धमाल डान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले कलाकार निखिल बने, श्रमेश बेटकर आणि मंदार मांडवकर हे केवळ स्टेजवरच नाही, तर सोशल मीडियावरही आपल्या चाहत्यांना खळखळून हसवत असतात. नुकताच या तिघांनी इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला असून, तो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या विनोदवीरांनी संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं 'सुंदरी सुंदरी'वर भन्नाट डान्स करत आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.
निखिल बनेने इंस्टाग्रामवर 'सुंदरी सुंदरी' गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये सुंदरी असं लिहिलं आहे. व्हिडीओवर लिहिलंय की, जेव्हा कळतं ती कोकणातली आहे. या व्हिडीओमध्ये तिन्ही कलाकार एका रांगेत उभे राहून गाण्याच्या बीटवर अतिशय मजेशीर हावभाव आणि स्टेप्स करताना दिसत आहेत. निखिल बने आपल्या खास अंदाजात, श्रमेश बेटकर चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सने आणि मंदार मांडवकर आपल्या विनोदी देहबोलीने या डान्सला एक वेगळीच रंगत आणत आहेत.
या रीलमध्ये कोणताही मोठा सेट-अप किंवा कोरिओग्राफी नसतानाही, त्यांच्या नैसर्गिक विनोदी टायमिंगमुळे चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतले आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर "सुंदर, बहारदार जबरदस्त," "रॉकिंग परफॉर्मन्स आग लगा दी," आणि "ऑल थ्री लाजवाब" अशा कमेंट्स करत प्रेम व्यक्त केले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून हे कलाकार आपले 'बिहाइंड द सीन्स' आणि मनोरंजक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचा हा लेटेस्ट डान्स व्हिडिओ त्यांच्या मैत्रीतील धमाल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची त्यांची आवड दर्शवतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मनोरंजनाचा 'डोस' ठरत आहे, यात शंका नाही!