अविस्मरणीय! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावले हास्यजत्रेचे कलाकार, वनिताने शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:13 PM2023-07-23T12:13:06+5:302023-07-23T12:13:53+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम सध्या युएस दौऱ्यावर आहे.

maharashtrachi hasyajatra show housefull at toronto vanita kharat shared emotional video | अविस्मरणीय! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावले हास्यजत्रेचे कलाकार, वनिताने शेअर केला Video

अविस्मरणीय! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावले हास्यजत्रेचे कलाकार, वनिताने शेअर केला Video

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम सध्या युएस दौऱ्यावर आहे. तिथल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हास्यजत्रेचे कलाकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. तसंच त्यांना येणारे अनुभवही ते सांगत आहेत. अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही टीम फिरत असून शो हाऊसफुल सुरु आहेत. वनिता खरातने (Vanita Kharat) टोरंटोमधील थिएटरचा एक व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद दाखवला आहे.

वनिताने पोस्ट शेअर करत लिहिले, 'टोरंटो तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा थिएटरला परफॉर्म करता येणं, ते ही हाऊसफुल्ल शो ला! एका कलाकाराला या पेक्षा मोठी गोष्ट ती काय! अविस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत हिच रंग देवते चरणी प्रार्थना.'

वनिताच्या या पोस्टवर सर्वच कलाकारांनी कमेंट करत 'अविस्मरणीय प्रयोग' अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ही टीम जगभर गाजत असून सर्वच मराठी प्रेक्षक त्यांना उदंड प्रतिसाद देत आहेत. आपल्यासारख्या मराठी कलाकारांमुळेच मराठी लोकांची ख्याती दूरवर पोहचत असल्याचं सांगत नेटकऱ्यांनी आणि मराठी प्रेक्षकांनी त्यांचं कौतुक केलंय.

Web Title: maharashtrachi hasyajatra show housefull at toronto vanita kharat shared emotional video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.