"हास्यजत्रा फॅमिलीसोबत नाही पाहू शकत" चाहत्याच्या विधानावर पृथ्वीक प्रताप म्हणतो,"वाह रे दुनिया..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:40 AM2023-05-14T09:40:55+5:302023-05-14T09:42:17+5:30

काही जोक आता कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचे नाहीत अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली.

maharashtrachi hasyajatra show fan says its not worth to watch with family actor prithvik pratap replies | "हास्यजत्रा फॅमिलीसोबत नाही पाहू शकत" चाहत्याच्या विधानावर पृथ्वीक प्रताप म्हणतो,"वाह रे दुनिया..."

"हास्यजत्रा फॅमिलीसोबत नाही पाहू शकत" चाहत्याच्या विधानावर पृथ्वीक प्रताप म्हणतो,"वाह रे दुनिया..."

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सध्याचा लोकप्रिय मराठी विनोदी शो. यातील सर्वच कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. तसंच त्यांच्या विनोदाचं टायमिंगही जबरदस्त असतं. कुटुंबासोबत एक तास हा कार्यक्रम बघून पोट धरुन हसण्याची गॅरंटी असते. पण काही जोक आता कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचे नाहीत अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली. यावर हास्यजत्रेचा कलाकार पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

हास्यजत्रेतील सर्वच कलाकार आता लोकप्रिय झाले आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेकदा कलाकार इन्स्टाग्रावरील स्टोरीमधून चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतात. नुकतंच एका चाहत्याने पृथ्वीकच्या 'आस्क मी' या सेशनमध्ये हास्यजत्रा कार्यक्रमावर टीका केली. तो म्हणाला,"महाराष्ट्राची हास्यजत्रा आता फॅमिली शो राहिलेला नाही, फॅमिली सोबत बसून तुमच्या जोकवर हसलो तर तिथेच विषय संपतो."

चाहत्याच्या या विधानावर पृथ्वीक म्हणतो, "incognito mode मध्ये जाऊन porn बघणाऱ्यांनी फॅमिली शोच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई बहिणीवरुन १०० शिव्या घालणाऱ्यांना सुद्धा एखादा डबल मिनिंग पंच आला की त्रास होतो. वाह रे दुनिया!"

प्रेक्षकाच्या या विधानावर पृथ्वीकने तितकीच संतापून प्रतिक्रिया दिल्याचे दिसते. पृथ्वीकची ही पोस्ट तुफान व्हायरल होत  आहे.

Web Title: maharashtrachi hasyajatra show fan says its not worth to watch with family actor prithvik pratap replies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.