Shivali Parab Video : “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 18:27 IST2023-01-25T18:25:26+5:302023-01-25T18:27:12+5:30
Shivali Parab Video : होय, शिवालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शिवाली आहेच पण हास्यजत्रेचे सगळे कलाकारही आहेत. या व्हिडीओत शिवाली नो मेकअप लुकमध्ये दिसतेय. पण तिचा स्वॅग काही वेगळाच आहे.

Shivali Parab Video : “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!!
छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते. शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झळकली. हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने तिला खरी ओळख दिली. हीच शिवाली सध्या तिच्या एका भन्नाट रिलमुळे चर्चेत आली आहे.
होय, शिवालीने एक रिल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात शिवाली आहेच पण हास्यजत्रेचे सगळे कलाकारही आहेत. या व्हिडीओत शिवाली नो मेकअप लुकमध्ये दिसतेय. पण तिचा स्वॅग काही वेगळाच आहे.
“किती दिवस बनून राहू तुझी मी पाहुणी, घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, असं ती म्हणते आणि मग मागून सगळे एकच गलका करतात, असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. आलो, फक्त १० मिनिटं थांब..., असं एका युजरने लिहिलं आहे. येऊ का मागणी घालायला, असं एका चाहत्याने विचारलं आहे. आलो घरी घालायला लग्नाची मागणी , चहा अन पोहे करून ठेव ग साजणी..., अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये झळकली. ‘हृदयात वाजे समथींगल’ ही तिची पहिली मालिका गाजली आणि त्या नंतर शिवाली ‘बॅक बेंचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवालीला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रे’मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे.