'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'कोकणची सुकन्या' रसिकाची पतीसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:17 IST2024-04-19T14:16:39+5:302024-04-19T14:17:07+5:30
Rasika Vengurlekar : कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहचली आहे. आज तिचा नवरा अनिरुद्ध शिंदेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'कोकणची सुकन्या' रसिकाची पतीसाठी खास पोस्ट
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra)मधील सगळेच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत. त्यांना या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता आवटे, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. या विनोदवीरांमधील कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर(Rasika Vengurlekar)ला देखील या शोमधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमुळे तिचे फॅन फॉलोव्हिंगदेखील वाढलं आहे. दरम्यान आज तिचा नवरा अनिरुद्ध शिंदेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
रसिकां वेंगुर्लेकर हिने इंस्टाग्रामवर पती अनिरुद्ध शिंदेसोबतचे फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, हॅप्पी बर्थडे लव्ह. तिच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रसिका आणि अनिरुद्धची हटके लव्हस्टोरी
रसिका वेंगुर्लेकरने २०१८ साली दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदेसोबत लग्नगाठ बांधली. मुंबईतील परळ येथील एमडी महाविद्यालयात त्यांची पहिल्यांदा भेट झाली. महाविद्यालयात असल्यापासून ते दोघेही एकांकिकेत काम करत होते. एमडी नाट्यांगण या एकांकिकेत त्या दोघांची भूमिका होती. तेव्हाच अनिरुद्ध रसिकाच्या प्रेमात पडला. त्याने तिला प्रपोझ करायचे ठरवले आणि बसस्टॉपवर तिला मागणी घातली. मात्र रसिकाने ती नाकारली. जेव्हा त्याने प्रपोझ केलं तेव्हा रसिका फर्स्ट इयरला होती. तिला करिअरकडे लक्ष द्यायचे होते. त्यामुळे ते मित्र राहिले. पण यादरम्यान रसिकाही त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.