"तुझ्या शेजारी येऊन हे असं पहुडणं..." 'त्या' खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:14 IST2025-05-19T13:13:04+5:302025-05-19T13:14:54+5:30
प्रियदर्शिनी इंदलकरने लिहिलेली 'ही' खास पोस्ट वाचा...

"तुझ्या शेजारी येऊन हे असं पहुडणं..." 'त्या' खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहे. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री नेहमी सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच प्रियदर्शिनी इंदलकरनं एका खास व्यक्तीसाठी सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरची खास मैत्रिण आरती मोरेचा काल वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शिनीनं पोस्ट शेअर केली. तिनं लिहलं,"तुझ्या शेज़ारी येऊन हे असं पहुडणं , हे माझ्या आयुष्यातलं one of the priviledge आहे ! दमुन थकल्यावर.. किंवा आनंदात उड्या मारून थकल्यावर.. पुन्हा पुन्हा इथेच येते. या हक्काच्या जागी.. जिथे हे हास्य माझी वाट बघत असतं... खरंतर गवतापासुन झाडांपर्यंत,आणि वहीच्या पानापासून , सिमेंटच्या छतापर्यंत, सगळी कडे बागडणारं फुलपाखरु आहेस तू ! फुलपाखराला स्वतःचे रंग दिसत नसतात, हे त्याचं दुर्दैवं , पण म्हणून ते आहेत हे त्यानी विसरता कामा नये ! Happy birthday माझं फुलपाखरु", या प्रेमळ शब्दात अभिनेत्रीनं आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर प्रियदर्शनीची आरतीसाठीची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. प्रियदर्शिनी आणि आरती यांनी 'विषामृत' नावाच्या नाटकात एकत्र काम केलेलं आहे. दोघींची नि:स्वार्थ अशी मैत्री आहे. आयुष्यातील चांगले, वाईट प्रसंग शेअर करण्यासाठी दोघी कायम एकमेकांसाठी सोबत असतात.
आरती मोरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'जय मल्हार', 'अस्मिता',' दिल दोस्ती दोबारा','गुलमोहर' या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली. 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकातली तिची भूमिका प्रचंड गाजली होती. तर मुळची पुण्याची असलेल्या प्रियदर्शनीने 'ई टीव्ही मराठी' या वाहिनीवरील 'अफलातून लिटील मास्टर्स' या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. प्रियदर्शिनी 'फुलराणी' या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं.