"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना..."; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:12 IST2025-04-14T11:09:57+5:302025-04-14T11:12:27+5:30
'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने आंबेडकर जयंतीच्या दिल्या खास शुभेच्छा. सर्वांनी अभिनेत्याचं चांगलंच कौतुक केलंय (maharashtrachi hasyajatra, prithvik pratap)

"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना..."; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांची आज १३४ वी जयंती. आज जगभरात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जगभरातील सामान्य नागरीकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करुन सर्वांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) फेम लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक प्रतापने (prithvik pratap) खास शब्दांमध्ये सर्व चाहत्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वीकने आंबेडकर जयंतीच्या खास अंदाजात दिल्या शुभेच्छा
पृथ्वीकने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन म्हणाला की, "जय भीम मित्रांनो. भारतरत्न बोधिसत्व परमपुज्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम."
या व्हिडीओखाली पृथ्वीकने कॅप्शन लिहिलंय की, "ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्या महामानवाच्या म्हणजेच…भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा! थँक्यू बाबासाहेब."
अशाप्रकारे पृथ्वीकने खास अंदाजात आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वीक प्रतापच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये विविध कॅरेक्टर्स साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतोय. पृथ्वीक प्रतापने हास्यजत्रेत येण्याआधी 'क्लास ऑफ ८३' सिनेमात बॉबी देओलसोबत काम केलं होतं. या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानने केली होती.