एक नवी सुरुवात... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप गुपचूप अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 15:25 IST2024-10-25T15:24:44+5:302024-10-25T15:25:25+5:30

पृथ्वीक प्रतापने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prithvik Pratap Got Married To His Lady Love Photo Went Viral | एक नवी सुरुवात... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप गुपचूप अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

एक नवी सुरुवात... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप गुपचूप अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील काही व्यक्तींचे स्थान हे अढळ आहे आणि त्यापैकी एक आहे पृथ्वीक प्रताप. विविध भूमिकांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या पृथ्वीक प्रतापने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.  आज पृथ्वीक प्रताप हा लग्नबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंकडे पाहून दोघेही अत्यंत आनंदी असल्याचे दिसून येतेय. 

पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. कॅप्शनमध्ये पृथ्वीकने लिहिलं आहे, "२५-१०-२०२४… एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने".  पृथ्वीक आणि त्याची पत्नी प्राजक्तावर कलाकार मंडळींसह चाहत्यांकडून शुभेच्छा वर्षाव होतं आहे.



या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री अप्रतिम असून चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये. ऑफव्हाईट कुर्ता आणि धोतर यामध्ये पृथ्वीक खूपच हँडसम दिसतोय तर त्याच्या पत्नीही गोल्डन साडीत अगदी सुरेख दिसतेय.  दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगून जातोय. 


पृथ्वीक प्रताप हा विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. पृथ्विकचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. पृथ्विकने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'जागो मोहन प्यारे', 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही त्याने काम केलं आहे. 'डिलिव्हरी बॉय' या मराठी सिनेमातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 

Web Title: Maharashtrachi Hasyajatra Fame Prithvik Pratap Got Married To His Lady Love Photo Went Viral