'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:29 IST2025-06-25T13:28:31+5:302025-06-25T13:29:05+5:30

'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे (Gaurav More) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचला. या शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

'Maharashtrachi Hasyajatra' fame Gaurav More will tie the knot soon? He himself revealed, said... | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...

'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे (Gaurav More) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचला. या शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याची हेअरस्टाईल, भाषा, विनोदाचं अचूक टायमिंग सगळेच गाजले. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडल्यानंतर तो 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान आता गौरव मोरे लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचे सांगितलं जातंय.  

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये एका स्किटमध्ये गौरव मोरेचं लग्न दाखवलं गेलं होतं. पण, ते झालं नाही. मग खऱ्या आयुष्यात गौरव मोरे कधी लग्न करतोय, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेने लग्नावर भाष्य केले होते. या मुलाखतीत गौरवला विचारण्यात आलं की, ''शोमध्ये एक लग्नाचे स्किट आहे, ज्यामध्ये तुझं लग्न शेवटपर्यंत होतंच नाही. तर खऱ्या आयुष्यात लग्नाबद्दल काय विचार आहे?' त्यावर गौरव म्हणाला की, 'शनिवारी सांगतो.' पुढे इतर रिपोटर्सनी विचारलं की, काय मग? विचार आहे? बघितलंय की नाही अजून? त्यावर गौरव मोरे म्हणाला की, 'होईल कधी ना कधी, मी नक्की सांगेन. यावर्षी नाही पुढील वर्षी करेन. तारीख ठरली नाही आहे, महिना ठरलेला नाही. पण होईल.''

'हास्यजत्रा'मध्ये कमबॅक करणार का?

याच मुलाखतीत गौरव मोरेला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कमबॅक करणार का? असे विचारण्यात आले. त्यावर अभिनेता म्हणाला की, ''तशी शक्यता सध्या कमी आहे. मला वेबसीरिज करायची आहे. मी तशी शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सध्या मी तिकडे लक्ष केंद्रित केले आहे.''
 

Web Title: 'Maharashtrachi Hasyajatra' fame Gaurav More will tie the knot soon? He himself revealed, said...