'कोकणी मातीतला कलाकार...', समीर चौघुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:09 PM2023-06-20T14:09:04+5:302023-06-20T14:49:21+5:30

बऱ्याचदा समीर त्याच्या सहकलाकारांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो.

Maharashtrachi hasya jatra fame samir chaughule shared post for prabhakar more | 'कोकणी मातीतला कलाकार...', समीर चौघुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

'कोकणी मातीतला कलाकार...', समीर चौघुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडतात. या कार्यक्रमातील विनोदवीर घराघरात लोकप्रिय झाले आहेत. अभिनेता म्हणजे समीर चौघुले(samir choughule)लाही महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे लोकप्रियता मिळाली. उत्तम अभिनयशैलीसह लेखन कौशल्य लाभलेला समीर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. 

त्यामुळे बऱ्याचदा समीर त्याच्या सहकलाकारांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. यात नुकतीच त्याने या कार्यक्रमातील अभिनेता  प्रभाकर मोरे(prabhakar more) यांच्याविषयी पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


''हॅप्पी बर्थ डे Prabhakar More ...आमचा हास्य जत्रेचा "कातील मोरे".....आमच्या मोरेंचा swag च वेगळा आहे....याच टायमिंग, पंच टाकण्या आधी घेतलेला stance सगळंच अफाट आहे...कोकणी मातीतला कलाकार मालवणी बाणकोटी भाषेत मंचावर अक्षरशः धुमाकूळ घालतो...विशेषतः multi millioner वगैरे भूमिकेत हा तुफान भाव खाऊन जातो...जगप्रसिद्ध शालू या नृत्य प्रकाराचा हा जनक आहे.... स्वभावाने अत्यंत साधा सरळ.... रंगभूमीवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव, साक्षात बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळी यांच्याबरोबर वस्त्रहरण या नाटकात काम करण्याचा भाग्य आमच्या प्रभाकरला लाभलंय....मित्रा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.'' असं समीरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे . आपल्या अभिनयातून, विनोदातून प्रभाकर मोरे कायमच त्यांची कोकणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात.  प्रभाकर मोरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर त्यांचं शालू हे गाणंदेखील सुपरहिट आहे.

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame samir chaughule shared post for prabhakar more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.