डान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 12:18 IST2018-04-24T06:45:09+5:302018-04-24T12:18:05+5:30

आंतरराष्ट्रीय स्तराच्या तोडीचं टॅलेंट असलेल्या लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये प्रेक्षकांना नेहमीच काही तरी नवीन पाहायला मिळते. ...

Maharashtra Dance will be hosted by 'Saratmoy' | डान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'

डान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'

तरराष्ट्रीय स्तराच्या तोडीचं टॅलेंट असलेल्या लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये प्रेक्षकांना नेहमीच काही तरी नवीन पाहायला मिळते. दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत. अभिनेता सुव्रत जोशीचे मनोरंजक सूत्रसंचालन प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

मागील आठवड्यात डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकांचा प्रवेश झालेला पहायला मिळाला होता आणि या आठवड्यात या मंचावर काही खास पाहुणे येणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्समध्ये संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या 'सैराट' या सुपरहिट चित्रपटाची स्टारकास्ट येणार आहे. सैराट हा बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा पल्ला गाठणारा पहिला मराठी चित्रपट असून यावेळी प्रथमच चित्रपटाची टीम - नागराज मंजुळे, रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर एका रिअॅलिटी शोच्या मंचावर येणार आहेत. या आठवड्याची थीम नात्यांवर आधारीत आहे. शेतकऱ्यांचा संघर्ष वर्णन करणारा एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा अॅक्ट वन मॅन आर्मी-चेतनने सादर केला आणि परीक्षकांनी सुध्दा त्याला मनापासून दाद दिली. इतर स्पर्धकांना टक्कर देत ओम ग्रुपने त्यांच्या ग्रुप मधील समिक्षा नावाच्या एका मुलीच्या खऱ्या गोष्टीवर परफॉर्म केले, यात तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिचे वडील जादा काम करतात त्यांचे त्यांच्या मुलीवर इतके प्रेम आहे हे सर्व निदर्शित केले होते. त्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय हृद्यस्पर्शी आणि भावनाशील होता की तो पाहिल्यानंतर परीक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. या इमोशनल परफॉर्मन्स नंतर सर्वांचा मूड हलकाफुलका करण्यासाठी वायके ग्रुपने मंचावर राधाकृष्णा वरील पौराणिक नाट्य गुजराती गरब्यातून सादर केले. त्यांचा डान्स पाहून सर्वांना डान्स करण्याची इच्छा होत होती आणि टीमने त्यांच्या सोबत गरबा केला. नागराज मंजुळे यांनी सुद्धा एक कविता सादर केली.

ALSO READ :   झी टॉकीजवर लवकरच ‘सैराटच्या नावानं चांगभलं’

डान्स महाराष्ट्र डान्स च्या मंचावर सैराटची टीम ‘सैराटचा नवा चांगभल’ ची घोषणा करण्यासाठी आली होती आणि त्यात ते झी टॉकिजवर सैराट सारखा अतिशय गाजलेल्या मराठी सिनेमाचा सुंदर प्रवास सांगणार आहेत. 

Web Title: Maharashtra Dance will be hosted by 'Saratmoy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.