महाभारत : जॅकी श्रॉफला मिळणार होता अर्जुनाचा रोल, अचानक झाली फिरोज खानची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:02 IST2020-04-27T16:59:37+5:302020-04-27T17:02:10+5:30

महाभारताचा किस्सा...

mahabharat jackie shroff was the first choice for arjun role firoz khan revealed in latest interview-ram | महाभारत : जॅकी श्रॉफला मिळणार होता अर्जुनाचा रोल, अचानक झाली फिरोज खानची एन्ट्री

महाभारत : जॅकी श्रॉफला मिळणार होता अर्जुनाचा रोल, अचानक झाली फिरोज खानची एन्ट्री

ठळक मुद्देआधी अर्जुनाच्या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफ यांची  निवड झाली होती.

डीडी भारतीवर सुरु झालेल्या महाभारत या मालिकेतील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला महाभारतात अर्जुनाची भूमिका साकारणा-या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. होय, या अभिनेत्याचे नाव आहे फिरोज खान. पण आता तो अर्जुन याच नावाने ओळखला जातो. याचे कारण फिरोज खानने  महाभारताच्या वेळीच आपले नाव बदलून अर्जुन केले होते. ‘महाभारत’ ही मालिका पुन्हा प्रसारित होत असल्याने तूर्तास हा अर्जुन कमालीचा आनंदी आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या ताज्या मुलाखतीत तो यावर बोलला. ‘महाभारत’ पुन्हा टीव्हीवर सुरु झाल्याने मीच नाही तर माझे नातवंडही जाम खुश आहेत. मला बाण चालवताना पाहून त्यांचा आनंद ओसंडून वाहतोय. आजही या मालिकेला एवढे प्रेम मिळतेय, याचा मला विशेष आनंद आहे, असे अर्जुन म्हणाला.

‘महाभारता’त त्याला अर्जुनाची भूमिका कशी मिळाली, याचा किस्साही त्याने ऐकवला. त्याने सांगितले, ‘आधी अर्जुनाच्या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफ यांची  निवड झाली होती. माझेही नाव चर्चेत होते. पण मला काहीही करून ही भूमिका हवी होती. मी एक आठवडा प्रतीक्षा केली. आठवडा उलटूनही कॉल न आल्यामुळे मी थेट बी. आर. चोप्रांच्या आॅफिसमध्ये धडकलो. बी. आर. यांनी मला कॉस्च्युम आणि मिशी अशा फुल गेटअपमध्ये यायला सांगितले. मी फुल गेटअपमध्ये बी. आर. चोप्रांसमोर जाऊन उभा राहिलो आणि त्यांनी तिथेच हा रोल तुझा, असे मला सांगितले. बी. आर. चोप्रा आणि डॉ. रजा यांच्या सल्ल्यानुसार मी माझे नाव अर्जुन ठेवले. याच नावाने इंडस्ट्रीत मला नवी ओळख दिली. माझ्यासाठी करिअरचे दरवाजे उघडले. ’

Web Title: mahabharat jackie shroff was the first choice for arjun role firoz khan revealed in latest interview-ram