आता मराठी छोट्या पडद्यावरही झळकणार धकधक गर्ल माधुरी दिक्षीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 14:21 IST2018-05-09T08:51:55+5:302018-05-09T14:21:55+5:30

बॉलिवुडच्या दिग्गज कलाकारांनी आपापल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावून मराठी रसिकांचं फुल ऑन मनोरंजन केले आहे.याआधी या मंचावर ...

Madhuri Dixit may be seen on Marathi screens too! | आता मराठी छोट्या पडद्यावरही झळकणार धकधक गर्ल माधुरी दिक्षीत !

आता मराठी छोट्या पडद्यावरही झळकणार धकधक गर्ल माधुरी दिक्षीत !

लिवुडच्या दिग्गज कलाकारांनी आपापल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावून मराठी रसिकांचं फुल ऑन मनोरंजन केले आहे.याआधी या मंचावर सलमान खान,शाहरूख खान,सोनम कपूर,कंगणा राणौत यासारख्या अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही रसिकांना पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रेटींना मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले.त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडतायत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.आपल्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यासाठी माधुरी दिक्षीतलाही 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावणार आहे.आगामी ‘बकेट लिस्ट’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी माधुरी या मंचावर एंट्री करणार आहे.

नुकतंच अशाच एका मराठी पुरस्कार सोहळ्यात माधुरी अवतरली होती.तिच्या उपस्थितीने या सोहळ्याला जणू काही चारचाँद लावले.निळ्या रंगाच्या साडीत माधुरी मंचावर अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर झाले होते.तर दुसरीकडे मराठी सेलिब्रिटींची अवस्थाही काही वेगळी नव्हती. यावेळी मराठी स्टार्सना माधुरीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी मंचावर माधुरी चक्क 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेसोबत फुगडी खेळताना दिसली.यावेळी दोघींचा उत्साह आणि आनंद पाहण्याजोगा होता.रसिकांनीही या फुगडीला मनापासून दाद दिली.माधुरीचा 'बकेटलिस्ट' हा पहिला सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे मराठमोळ्या माधुरीच्या या पहिल्या सिनेमाची रसिकांना प्रतीक्षा लागली आहे.'बकेटलिस्ट'मध्ये रणबीर कपूर या सिनेमात एका सुपरस्टारची छोटीशी भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे.दरम्यान, सिनेमाच्या ट्रेलरमध्ये माधुरीचा अंदाज भावण्यासारखा आहे.ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘राधिका, तुला बकेट लिस्ट’ माहिती आहे काय? असे माधुरीच्या आवाजातील शब्द कानावर पडतात.त्याचबरोबर माधुरीचा मराठमोळा नववारीतील अवताराची झलकही बघावयास मिळते. स्वत:च्या दैनंदिन आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असलेल्या एका महिलेची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. या चित्रपटात माधुरी प्रेक्षकांना माधुरी सानेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बकेट लिस्ट माझी, तुमची आपल्या सगळ्यांची,’ अशी या चित्रपटाची टॅग लाइन असून, सई या व्यक्तिरेखेचा माधुरीच्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेला बदल या चित्रपटात दाखवला जाणार आहे. 

Web Title: Madhuri Dixit may be seen on Marathi screens too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.