माधुरी दीक्षितने आईचे 'हे' स्वप्न केले पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 10:11 IST2018-07-19T09:57:56+5:302018-07-19T10:11:29+5:30
आगामी एपिसोडमध्ये आलोक आणि पलक यांच्या जोडीने शम्मी कपूर यांचे लोकप्रिय गाणे बदन पे सितारे सादर करत आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार आहेत

माधुरी दीक्षितने आईचे 'हे' स्वप्न केले पूर्ण
स्पर्धा अतिशय तीव्र होत चालली असताना, डान्स दिवानेचे स्पर्धक त्यांच्या दिमाखदार कामगिरीने संपूर्ण देशाला प्रभावित करण्यासाठी मेहनत घेत आहेत. आगामी एपिसोडमध्ये एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांना पुन्हा एकदा वाइल्ड कार्ड एंट्री मधून स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आगामी एपिसोडमध्ये आलोक आणि पलक यांच्या जोडीने शम्मी कपूर यांचे लोकप्रिय गाणे बदन पे सितारे सादर करत आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार आहेत. या परफॉर्मेन्सनंतर पलकने आलोकच्या आईविषयी गुपित सांगितले कि, त्याच्या आईला डान्स नेहमीच आवडतो आणि या वयातही त्या कार्टव्हिल्स करू शकतात. हे गुपित ऐकल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्याच्या झलकी पाहण्याची मागणी केली. आलोकच्या आईला मंचावर बोलावण्यात आले आणि परीक्षकांच्या समोर परफॉर्म करण्यात त्यांना खूप आनंद झाला. माधुरी दीक्षितने त्यांना डान्स दिवाने मध्ये भाग न घेण्याचे कारण विचारले. आलोकच्या आई भावूक होत म्हणाल्या की आर्थिक परिस्थिती इतकीशी चांगली नसल्यामुळे त्यांच्या पैकी एकालाच भाग घेता आला असता. मुलाचे स्वप्न पूर्ण होण्यातच तिचे स्वप्न पूर्ण होणार होते. या विचाराने भारावलेल्या माधुरी दीक्षितने तिच्या जीवनातील अशीच एक गोष्ट यावेळी शेअर करत ती म्हणाली की, “ माझ्या आईचे डान्सर बनण्याचे स्वप्न होते पण काही परिस्थितीमुळे ती ते पूर्ण करू शकली नाही. पण जेव्हा तिने मला डान्स करताना पाहिले तेव्हा तिला तिचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले आणि तिला आनंद झाला कारण तिचा विश्वास आहे की मी तिचे स्वप्न जगते आहे.” आई नेहमीच विशेष असते, मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या नेहमीच त्यांच्या इच्छांना मुरड घालतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी शक्य ते सर्व काही करतात.