आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:15 IST2023-04-11T12:14:37+5:302023-04-11T12:15:44+5:30

मधुराणीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली.

madhurani gokhale tv actress social media post viral regarding 900 days celebration of serial | आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका अल्पावधीतच प्रसिद्ध झाली.  यातील सर्वच पात्र, कलाकार गाजले. 'आई' ही मुख्य भूमिका साकारणारी मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेचे 900 भाग पूर्ण झाले आहेत. तर आता लवकरच मालिका 1000 एपिसोड्स पूर्ण करेल. यानिमित्ताने कलाकारांनी सेलिब्रेशन केले.

मधुराणीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. हल्ली केवळ पार्टी करुन आनंद साजरा करतात. पण मालिकेच्या टीमने अनोख्या रितीने एंजॉय केले. ते कसे तर मधुराणीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती माईकवर 'ए जिंदगी गले लगा ले' हे गाणं म्हणताना दिसत आहे. याला कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'आई कुठे काय करते चे लवकरच १००० भाग पूर्ण होतील. ९०० भागपूर्ती च्या निमित्ताने आमचे निर्माते राजन शाही सरांनी होम केला होता. आजच्या काळात पार्टी न करता अशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो हे महत्त्वाचे..तर त्या दिवशी उत्स्फूर्तपणे मी गायलेलं हे गाणं... अचानक सापडलं....आज तुमच्यासाठी पेश'

यावर चाहत्यांनीही कमेंट्स करत मधुराणीचं कौतुक केलं आहे. 'तुमचा आवाज ऐकून कान तृप्त होतात' अशी कमेंट एकाने केली आहे. 'मालिकेचे १००० भाग पूर्ण करावे' असंही एका चाहत्याने म्हटलंय.

Web Title: madhurani gokhale tv actress social media post viral regarding 900 days celebration of serial