माधवी निमकरच्या चाहतीने चक्क हातावर काढला अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:41 IST2024-11-28T16:40:23+5:302024-11-28T16:41:24+5:30
Madhavi Nimkar : माधवी निमकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पाहायला मिळतंय की, माधवी निमकरत्या चाहतीने चक्क हातावर तिच्या नावाचा टॅटू काढला आहे.

माधवी निमकरच्या चाहतीने चक्क हातावर काढला अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतंने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतून शालिनीच्या भूमिकेतून अभिनेत्री माधवी निमकर घराघरात पोहचली. माधवी निमकर तिच्या अभिनयाशिवाय फिटनेससाठी ओळखली जाते. ती व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान आता माधवी निमकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पाहायला मिळतंय की, माधवी निमकरत्या चाहतीने चक्क हातावर तिच्या नावाचा टॅटू काढला आहे.
अभिनेत्री माधवी निमकर हिने सोशल मीडियावर तिच्या चाहतीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, माधवी तिच्या चाहतीच्या हातावरील टॅटू दाखवताना दिसत आहे. त्यानंतर चाहतीच्या गालावर किस करताना दिसत आहे. तसेच अभिनेत्रीनेदेखील चाहतीचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, प्रिया काय बोलू मी? अतिशय महत्वाचा क्षण आहे माझ्यासाठी… माय बेस्ट फॅन मोमेंट..
माधवीने पुढे लिहिले की, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेवर, माझ्यावर खूप प्रेम केलेस… येताना खूप भेटवस्तू आणतेस. दरवर्षी माझा वाढदिवसाला घरी केक पाठवतेस… आता तर माझा नावाचा परमनंट टॅटू काढलास!! थँक्यू यू सो मच प्रिया तुझ्या अनकंडिशन प्रेमासाठी!! म्हणून तू स्पेशल आहेस घोरपडे प्रिया माणिकराव. तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल पुन्हा धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! धन्य राहा प्रिय.