'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत पुन्हा दिसणार मॅडी, कोण साकारणार ही भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 17:21 IST2021-03-17T17:21:20+5:302021-03-17T17:21:46+5:30

'अग्गंबाई सासूबाई'ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा सीक्वल 'अग्गंबाई सुनबाई' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Maddie to reappear in 'Aggabai Sunbai' series, who will play the role? | 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत पुन्हा दिसणार मॅडी, कोण साकारणार ही भूमिका?

'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत पुन्हा दिसणार मॅडी, कोण साकारणार ही भूमिका?

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सासूबाई'ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.  या मालिकेतील व्यक्तिरेखा तशाच ठेवून कथानक बदलले गेले असून आता ही मालिका 'अग्गंबाई सुनबाई' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.. यात आता आसावरी कर्तबगार होणार आहे. तर अशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान यांच्याजागी नवे चेहरे दाखल झाले आहेत. या मालिकेतून घराघरात पोहचलेली मॅडीचे पात्रदेखील सीक्वेलमध्ये पहायला मिळणार आहे. मात्र ही भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  


अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या सीक्वलमध्ये शुभ्रा आणि बबड्याची पात्र आता उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर साकारताना दिसत आहेत. त्यामुळे मालिकेत या पात्रांबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे मॅडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने मॅडीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली, आपल्या कामाचे कौतुक केले त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.  तसेच भावनिक होऊन तिने मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे.


 अग्गंबाई सासूबाई मालिकेतील मॅडीचा मॅडपणा आता संपला असला तरी तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अग्गंबाई सूनबाई या मालिकेतून पुन्हा एकदा मॅडीचा प्रवास पाहायला मिळणार आहे. यात थोडीशी वेगळी मॅडी तुम्हाला बघायला मिळेल. तिच्यावरही असेच प्रेम करा” असे तिने सुचवले असल्याने ही नवी मॅडी नेमकी कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो.

मालिका पाहिल्यावर लवकरच या प्रश्नाचे उत्तरही स्पष्ट होईल पण तुर्तास भक्ती रत्नपारखी हिने साकारलेल्या मॅडिला खरोखरच तोड नव्हती हे तिच्या अभिनयातून जाणवले. या नव्या मालिकेत भक्तीला पुन्हा एकदा मॅडीच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.

Web Title: Maddie to reappear in 'Aggabai Sunbai' series, who will play the role?