लुबना सलिम या गोष्टीसाठी आहे उत्सुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 13:57 IST2018-06-11T08:27:22+5:302018-06-11T13:57:22+5:30

नुकतीच सुरू झालेली मालिका 'मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह'मध्ये नावाजलेले कलाकार आहेत. टीव्ही अभिनेत्री लुबना सलिम यांनी अनेक नाटके आणि ...

Lubna Salim is eager for this thing! | लुबना सलिम या गोष्टीसाठी आहे उत्सुक!

लुबना सलिम या गोष्टीसाठी आहे उत्सुक!

कतीच सुरू झालेली मालिका 'मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह'मध्ये नावाजलेले कलाकार आहेत. टीव्ही अभिनेत्री लुबना सलिम यांनी अनेक नाटके आणि बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. या मालिकेत लुबना रिफत अश्रफची भूमिका साकारत आहेत.लुबना ह्या सगळ्‌याच माध्यमांतून काही उत्तम काम करत असून त्या नावाजलेले गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक गुलजार साब यांच्याही त्या खूप मोठ्या फॅन आहेत.ती  म्हणाली “मी त्यांना बाबा अशी हाक मारते. ते माझ्यासाठी वडिलांसारखे असून ह्या उद्योगात माझे गुरू आहेत.मी त्यांच्यासोबत सगळ्‌या खासगी आणि प्रोफेशनल गोष्टींबद्दल बोलू शकते आणि माझ्या समस्यांवर ते उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांनी खास माझ्यासाठी कविता लिहिली असून ते नेहमीच म्हणतात की लुबना हे तुझ्यासाठी आहे.” लुबना सांगते की मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्हमध्ये रिफतची व्यक्तिरेखा अतिशय आव्हानात्मक असून त्यांना अशाच व्यक्तिरेखेची प्रतीक्षा होती.

'बा बहू और बेबी' या मालिकेत लुब्ना सलिमने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तसेच 'ओह माय गॉड' या चित्रपटात ती परेश रावलच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. लुब्नाने केवळ छोट्या पड्यादवरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही खूपच चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. आज लुब्ना हे छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. ती नुकतीच 'चक्रव्यूह' या मालिकेत दिसली होती आणि आता मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेतील लुब्नाची भूमिका खूपच चांगली असल्याने या मालिकेत काम करण्यास ती खूपच उत्सुक आहे.रिफत ही आंबटगोड आणि तिखट मिरची असून आत्मकेंद्री आहे आणि या मालिकेत तिची खलनायकी भूमिका आहे. तिचे तिच्या परिवारावर प्रेम आहे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी ती काहीही करू शकते. तिच्या आणि माझ्या बाबतीत ही एकच गोष्ट समान असून बाकी सगळं वेगळं आहे. अर्थातच आपल्यापेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.”

Web Title: Lubna Salim is eager for this thing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.