लव्ह का है इंतजार फेम किथ सिक्वेरा आणि संजीदा शेख अडकले लिफ्टमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 16:14 IST2017-05-11T10:44:22+5:302017-05-11T16:14:22+5:30
किथ सिक्वेरा आणि संजीदा शेख सध्या लव्ह का है इंतजार या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची ...
लव्ह का है इंतजार फेम किथ सिक्वेरा आणि संजीदा शेख अडकले लिफ्टमध्ये
क थ सिक्वेरा आणि संजीदा शेख सध्या लव्ह का है इंतजार या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा ही एका राजाच्या आयुष्यावर आधारित असल्याने या मालिकेचा सेट देखील भव्य आहे. या मालिकेचा भव्य सेट कर्जतमध्ये उभारला आहे. त्यामुळे या मालिकेची टीम अधिकाधिक चित्रीकरण हे कर्जतमध्ये करते. त्यामुळे या दोघांचा अधिकाधिक वेळ हा चित्रीकरणातच जातो.
किथ आणि संजीदासाठी लव्ह का है इंतजार ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेचे प्रमोशन करण्याची एकही संधी हे दोघेही सोडत नाही. या मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी ते दोघे सध्या वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहेत. या मालिकेची टीम नुकतीच एका ठिकाणी गेली असता त्यांच्यासोबत एक खूपच मजेशीर प्रसंग घडला. या मालिकेच्या प्रमोशनसाठी किथ आणि संजीदा गेले असता ते एका लिफ्टमध्ये अडकले. खरे तर या लिफ्टची दुरुस्ती सुरू होती. पण हे या दोघांच्या लक्षात न आल्याने किथ आणि संजीदा लिफ्टमध्ये शिरल्यावर दोन मजल्यांच्यामध्ये ही लिफ्ट बंद पडली. ते मध्येच अडकल्याने त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. पण दोघांनीही लिफ्टमध्ये कंटाळून न जाता एकमेकांचे चांगले मनोरंजन केले. किथने काहीही करून संजीदाला बोअर होऊ दिले नाही. खरे तर त्यांना चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमधून थोडीशी उसंत मिळाली होती. या वेळेचा त्यांनी पुरेपूर वापर केला. ते दोघेही मनसोक्त हसले आणि त्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या.
![keith sequeira]()