ही मराठमोळी अभिनेेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, करणार अरेंज मॅरेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 16:36 IST2021-04-16T16:35:42+5:302021-04-16T16:36:56+5:30

या अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.

love lagna locha fame ruchita jadhav will marry soon | ही मराठमोळी अभिनेेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, करणार अरेंज मॅरेज

ही मराठमोळी अभिनेेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, करणार अरेंज मॅरेज

ठळक मुद्देलव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे रुचिता जाधवला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संग्राम साळवी, अस्ताद काळे काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे रुचिता जाधवला चांगलीच लोकप्रियता मिळाली. रुचिता अरेंज मॅरेज करणार असून पंचगणी येथे अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत तिचे लग्न पार पडणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूपच कमी लोकांना लग्नात उपस्थित राहाण्याची परवानगी आहे. त्यामुळेच 3 मे ला रुचिता अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत एका फार्म हाऊसमध्ये लग्न करणार आहे.

रुचिताचे हे अरेंज मॅरेज असून मुंबईतील व्यावसायिक आनंद मानेशी ती लग्न करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रुचिताने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये माझी आणि आनंदची ओळख झाली. हे अरेंज मॅरेज असून मी आनंदला भेटले त्यावेळी लग्न करण्याचा विचार देखील माझ्या मनात नव्हता. मी चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. त्यामुळे मला आनंदला फार वेळ देता आला नाही. पण तो नेहमीच माझ्यासाठी वेळ काढायचा. डिसेंबर २०२०मध्ये आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रुचिताने ‘भुताचं हनिमून’ आणि ‘माणूस एक माती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Web Title: love lagna locha fame ruchita jadhav will marry soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.