Lokmat DIA: शिव ठाकरे ठरला जोश मराठी सुपरस्टार; लोकमतकडून खास सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:18 IST2021-12-02T15:16:26+5:302021-12-02T15:18:45+5:30
तरुणाईचा फेव्हरेट आणि डॅशिंग अभिनेता अशी शिव ठाकरेची ओळख. अल्पावधीतच त्याने मराठी सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Lokmat DIA: शिव ठाकरे ठरला जोश मराठी सुपरस्टार; लोकमतकडून खास सन्मान
बॉलीवूडसह विविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तींचा सन्मान दरवर्षी लोकमतकडून करण्यात येतो.लोकमतच्या डिजिटल अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह उद्योग, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात आले. आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणा-या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. तरुणाईचा फेव्हरेट आणि डॅशिंग अभिनेता अशी शिव ठाकरेची ओळख. अल्पावधीतच त्याने मराठी सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या दिमाखदार सोहळ्यात Josh Marathi Superstar म्हणून शिव ठाकरेचा बोलबाला राहिला. Josh Marathi Superstar अवॉर्डचा तो मानकरी ठरला. शिव ठाकरेने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या हटके स्टाईल स्टेटमेंटसाठीही कायमच तो चर्चेत असतो. म्हणूनच शिव ठाकरेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मुंबईत होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्याला गौरवण्यात आलं.