पती रेमो डिसुझाला दिली पत्नी लिझेल डिसुझाने करवा चौथची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 14:02 IST2018-10-26T14:00:54+5:302018-10-26T14:02:25+5:30
करवा चौथच्या निमित्ताने रेमोला त्याची पत्नी लिझेलने आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे

पती रेमो डिसुझाला दिली पत्नी लिझेल डिसुझाने करवा चौथची भेट
बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक तसेच सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमात सुपरजज्जची भूमिका पार पाडताना रेमो डिसुझाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आता करवा चौथ हा सण जवळ आला असून त्या निमित्त आपला पती रेमोला आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक आगळी भेट देण्याचा निर्णय त्याची पत्नी लिझेलने घेतला आहे. तिने आपल्या मनगटावर रेमोचे नाव कायमचे गोंदवून टाकले आहे.
लिझेलचे रेमोवर अतिशय प्रेम असून त्या प्रेमाचा आविष्कार करण्यसाठी तिने त्याचे नाव आपल्या मनगटावर कायमचे गोंदवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे रेमोला आनंदाश्चर्याचा धक्का बसला आहे.
लिझेल आणि रेमो हे गेली 20 वर्षे सुखाने एकमेकांचे जोडीदार म्हणून नांदत असून आपल्या या अर्थपूर्ण नात्याबद्दल लिझेल म्हणाली, “रेमोबद्दल मला वाटत असलेल्या प्रेमाची खूण म्हणून मी त्याचे नाव माझ्या मनगटावर गोंदवून घेतले आहे. यंदा त्याला करवा चौथ या सणानिमित्त एक कायमस्वरूपी भेट द्यावी, असे माझ्या मनात आले. तेव्हा मी माझ्या डाव्या मनगटावर रेमो हे नाव गोंदवून घेतले. रेमोने माझे नाव त्याच्या शरीरावर दोन वर्षांपूर्वीच गोंदवून घेतले होते. त्यामुळे मीही त्याच्या या प्रेमाची परतफेड म्हणून त्याचे नाव माझ्या हातावर गोंदवून घेतले आहे.