लिलिपुतला लॉटरी लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 17:19 IST2016-09-14T11:45:14+5:302016-09-14T17:19:06+5:30
लिलिपुत गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. उडाण या मालिकेत तो नुकताच झळकला होता. लिलिपुतला सध्या दोन ...

लिलिपुतला लॉटरी लागली
ल लिपुत गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. उडाण या मालिकेत तो नुकताच झळकला होता. लिलिपुतला सध्या दोन मालिकांच्या ऑफर्स आल्या असून त्याने त्या दोन्ही स्वीकारल्या आहेत. यारो का टशन या मालिकेत तो एका चोराच्या भूमिकेत झळकणार आहे. गोवर्धनच्या लहानपणीचा मित्र म्हणून त्याची मालिकेत एंट्री होणार आहे. चोरी करायच्या उद्देशाने तो घरात घुसणार आहे. या मालिकेतील त्याची भूमिका खूपच चांगली आहे. त्याचसोबत तो नामकरण या मालिकेत रिमा लागूच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत झळकणार आहे. नामकरण मालिकेच्या चित्रीकरणाला तो लवकरच सुरुवात करणार आहे.