चला हवा येऊ द्या मध्ये झळकणार भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 11:05 IST2017-08-14T05:35:00+5:302017-08-14T11:05:00+5:30
झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक सेलिब्रिटी आले आहेत. सलमान खान, शााहरुख खान, श्रीदेवी, ...
चला हवा येऊ द्या मध्ये झळकणार भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू
झ मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक सेलिब्रिटी आले आहेत. सलमान खान, शााहरुख खान, श्रीदेवी, अनुष्का शर्मा, काजोल, अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमात प्रेक्षकांना काही स्पेशल गेस्ट पाहायला मिळणार आहेत.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू सहभागी होणार आहेत. या महिला खेळाडूंनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली तसेच अंतिम फेरीत धडकही मारली. या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या टीमशिवाय या कार्यक्रमात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीमसुद्धा सहभागी झाली होती. १४ आणि १५ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता हे दोन्ही भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
यानिमित्ताने पहिल्यांदाच अशा मराठी कार्यक्रमात या खेळाडू सहभागी झाल्या होत्या. "चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मी नेहमी बघते आणि तो मला खूप आवडतो" असे पूनम राऊत आवर्जून म्हणाली तर "विश्वचषक स्पर्धा सुरू असातनाही या कार्यक्रमाची संघात चर्चा व्हायची, याबद्दल मी खूप ऐकले होते, त्यामुळे यात सहभागी होण्याबद्दल मी उत्सुक होते," असं स्मृती मंधानाने सांगितले. या सर्व खेळाडूने यात सादर झालेल्या स्किटना भरभरून आणि खळखळून प्रतिसाद दिला.
Also Read : चला हवा येऊ द्या च्या मंचावर बाहुबली