खास चित्रीकरणासाठी घेतले धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:21 IST2016-08-11T11:51:18+5:302016-08-11T17:21:18+5:30
एक रिश्ता साझेदारी का या मालिकेत शिविया पठानिया प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिला बाईक चालवायची होती. पण ...

खास चित्रीकरणासाठी घेतले धडे
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">एक रिश्ता साझेदारी का या मालिकेत शिविया पठानिया प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिला बाईक चालवायची होती. पण तिने आयुष्यात कधीच बाईक चालवली नव्हती. त्यामुळे तिला खूपच टेन्शन आले होते. बाईक चालवणे खूपच कठीण होते असे शिविया सांगते. शिवियाला बाईक शिकवण्यासाठी एका ट्रेनरची नेमणूकही करण्यात आली होती. हा ट्रेनर सकाळी सहा वाजता तिला बाईक चालवायला शिकवत असे. या अनुभवाविषयी शिविया सांगते, "मला केवळ बाईकच्या मागे बसायला आवडते. मी कधी बाईक चालवू शकते असे मला वाटलेदेखील नव्हते. पण हे एक आव्हान म्हणून मी स्वीकारले. बाईक चालवायला शिकण्याचा अनुभव खूपच चांगला होता."