सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:30 IST2018-09-14T16:50:02+5:302018-09-16T06:30:00+5:30
'प्रेमा तुझा रंग कसा'च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
'प्रेमा तुझा रंग कसा'च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहेत.
'प्रेमा तुझा रंग कसा'च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथा त्यातून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरुप पाहायला मिळतील. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. 'प्रेमा तुझा रंग कसा' ही मालिका समाजत घडणाऱ्या याच घटनांविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
स्टार प्रवाहने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय,वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात स्टार प्रवाहची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे प्रेमा तुझा रंग कसा मालिकेचा दुसरा सीझन. धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका 'प्रेमा तुझा रंग कसा'चा दुसरा सीझन १७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारीत होणार आहे. अजिंक्य देव यांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.