'ठिपक्यांची रांगोळी'मधून दोन मुख्य कलाकारांनी ब्रेक घेत गाठली अमेरिका, आता कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 07:00 IST2022-08-14T07:00:00+5:302022-08-14T07:00:02+5:30

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून ब्रेक घेऊन दोन कलाकार अमेरिकला गेले आहेत. त्यांनी मालिकेतून का ब्रेक घेतला यामागचं कारण आता समोर आलं आहे.

Leena Bhagwat & Mangesh kadam took a break from the Thipkyanchi Rangoli serial | 'ठिपक्यांची रांगोळी'मधून दोन मुख्य कलाकारांनी ब्रेक घेत गाठली अमेरिका, आता कारण आलं समोर

'ठिपक्यांची रांगोळी'मधून दोन मुख्य कलाकारांनी ब्रेक घेत गाठली अमेरिका, आता कारण आलं समोर

गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या वहिन्यांवर अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. जुन्या मालिकांनी निरोप घेतला आहे. त्याजागी नव्या मालिका सुरु झाल्यात. या मालिकांमधून अनेक कलाकरांनी छोट्या पडद्यावर कमबॅक देखील केलं आहे. मालिकांमधले काही कलाकार एकाचवेळी मालिका, नाटक आणि सिनेमा या तिनही माध्यमांमध्ये एकाचवेळी काम करताना दिसतात. या सगळ्याचा समतोल सांभाळताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. अशा अनेकवेळा कलाकार मालिकेमधून काहीवेळेसाठी ब्रेक घेतात.

नुकताच मुरांबा मालिकेतून ब्रेक घेऊन शशांक केतकर अमेरिकेला गेला आहे. त्यानंतर आता ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील दोन कलाकारा देखील ब्रेक घेतला असल्याचं समजतंय. सध्या ते दोनही कलाकार अमेरिकेत आहे. 

'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात.

या मालिकेमध्ये लीना कदम आणि मंगेश कदम ही जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही जोडी खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. सध्या हे दोघेही ठिपक्यांची रांगोळी प्रसिद्ध मालिकेत शशांकच्या आई वडिलांची भूमिका साकारत आहेत.

ठिपक्यांची रांगोळीमध्ये  शशांकच्या आई वडिलांची भूमिका साकारत असलेले लीना भागवत आणि मंगेश कदम ब्रेक घेतलाआ हे. असल्याचं कळतंय. ही जोडी खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. मालिकेतून ब्रेक घेऊन दोघे अमेरिकेला गेले आहेत.. तिथं त्यांच्या आमने सामने या नाटकाच्या प्रयोग असल्याचं समजतंय.  सोशल मीडियावर त्यांनी अमेरिकेतील फोटो शेअर केलेत.

View this post on Instagram

A post shared by Leena Bhagwat (@leena.bhagwat.94)

Web Title: Leena Bhagwat & Mangesh kadam took a break from the Thipkyanchi Rangoli serial