‘झिंदगी की महेक’ मालिका घेणार लीप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 08:50 AM2018-05-29T08:50:17+5:302018-05-29T14:49:21+5:30

मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि दिग्गज कलाकारांचा अप्रतिम अभिनय यामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘झिंदगी की महेक’ या यशस्वी मालिकेने प्रेक्षकांना आपल्यावर ...

Leap to take a series of 'Zindagi Ki Maek' series | ‘झिंदगी की महेक’ मालिका घेणार लीप

‘झिंदगी की महेक’ मालिका घेणार लीप

googlenewsNext
गुंतवून ठेवणारे कथानक आणि दिग्गज कलाकारांचा अप्रतिम अभिनय यामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘झिंदगी की महेक’ या यशस्वी मालिकेने प्रेक्षकांना आपल्यावर खिळवून ठेवले आहे. आता या मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेण्यात येणार असून त्यानंतर प्रेक्षकांना कथानकाला नवे वळण लागल्याचे दिसेल. मालिकेच्या आगामी भागांत महेक (समीक्षा जायस्वाल) आणि शौर्य (करण व्होरा) यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळेल. स्वेतलानाच्या (राधिका भट) दुष्ट कारस्थानाला यश लाभून महेक आणि शौर्य यांचा अंत होईल; परंतु या दोघांचाही दोन स्वतंत्र कुटुंबात पुनर्जन्म होईल पण त्यांना आपल्या मागच्या जन्माचे विस्मरण झाले असेल.

कथानक जसे पुढे जाईल, तसे प्रेक्षकांना दिसेल की स्वेतलानाच्या दुष्ट कारस्थानाचा बदला घेण्यासाठी महेक व शौर्य यांना पुन्हा पाठविण्याची प्रार्थना कांता (किरणदीप शर्मा) करते. त्यानंतर दोन वेगवेगळ्या कुटुंबात दोन मुलांचा जन्म होतो आणि त्यांचे पालक त्यांची नावे योगायोगाने महेक आणि शौर्य अशीच ठेवतात! शौर्यचे वडील हे माजी बॉक्सर असतात आणि आपल्या मुलाने आपले सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करावे, हे त्यांची इच्छा असते. परंतु शौर्यला बॉक्सिंगमध्ये अजिबात स्वारस्य नसते; उलट त्याला विविध पाककृती बनविण्याची खूप आवड असते. दुसरीकडे महेकच्या वडिलांना मुलगा हवा असतो, पण त्यांना मुलगी होते. त्यामुळे ते तिच्यावर राग धरतात. यामुळे महेकच्या मनावर परिणाम होतो आणि ती एक कणखर आणि खंबीर मनाची तरुणी बनते. आपल्या वडिलांवरील राग व वैफल्याला वाट देण्यासाठी ती बॉक्सिंग शिकते. मालिकेचा काळ भविष्यात पुढे नेल्यानंतर झालेल्या पुनर्जन्मात करण व्होरा आणि समीक्षा जायस्वाल यांनी आपल्या
पूर्वीच्या भूमिकांची अदलाबदल केल्याचे जाणवेल. तसेच त्यांचे रूपही पूर्वीपेक्षा पूर्णपणे बदललेले दिसेल. करणने दाढीमिशा काढल्या असून तो साध्या कपड्यांमध्ये दिसेल; तर समीक्षाने आपले पारंपरिक कपडे त्यागून पुरुषांप्रमाणे आखूड केस ठेवलेले दिसतील.

या नव्या घडामोडींबद्दल करण व्होरा म्हणाला, “या मालिकेच्या कथानकात आता महत्त्वाचे बदल होत असून माझ्या भूमिकेतही बरेच बदल झाले आहेत. माझ्या रूपातही आमूलाग्र बदल होणार असून एका धूर्त उद्योगपतीऐवजी मी एक दाढीमिशा नसलेला, उत्साही, आकर्षक आणि पाककृतीची आवड असलेला बॉक्सिंग चॅम्पियन बनणार आहे. तसं तर वास्तव जीवनात माझं शौर्यच्या या नव्या रूपाशी खूपच साम्य आहे. आता प्रेक्षकांना माझा हा नवा अवतार पसंत पडेल आणि ते माझ्यावर आणि आमच्या मालिकेवर पूर्वीसारखंच प्रेम करतील आणि तिला पाठिंबा देतील, अशी आशा करतो.” तिच्या व्यक्तिरेखेबद्दल समीक्षा जायस्वाल म्हणाली, “महेकच्या भूमिकेत मला स्वीकारल्याबद्दल आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल सर्वप्रथम मला प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. या मालिकेमुळेच मला टीव्हीवर प्रथम संधी मिळाली, त्यामुळे मी या मालिकेचीही ऋणी राहीन. महेकची व्यक्तिरेखा पहिल्यापासूनच तशी शक्तिशाली आणि स्वतंत्र वृत्तीची होती. पुनर्जन्मानंतरही तिच्या या स्वभावात बदल होणार नसून आता ती बॉक्सरही बनलेली आहे. ती आपल्यापुढील समस्यांना बेधडक अंगावर घेते. पण पुनर्जन्मानंतर माझं रूप पूर्णपणे वेगळं असेल आणि तसं ते असम्यासाठी बरंच संशोधन आणि विचार करण्यात आला आहे. आता या नव्या रूपाला आणि व्यक्तिमत्त्वाला साजेशी भाषा आणि देहबोली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करीत आहे कारण ते नैसर्गिक दिसणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना माझं हे नवं रूप आवडेल आणि शौर्य-महेक यांच्या जीवनातील नव्या टप्प्याच्या कथानकाचा ते आनंद घेतील, अशी मी आशा करते.”

Web Title: Leap to take a series of 'Zindagi Ki Maek' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.