​चिडिया घर मालिका घेणार लीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:19 IST2016-12-24T13:19:27+5:302016-12-24T13:19:27+5:30

चिडिया घर ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील घोटक, गधाप्रसाद, बाबूजी, कोमल, मयुरी यांसारख्या ...

Lead to take home series of chidiya house | ​चिडिया घर मालिका घेणार लीप

​चिडिया घर मालिका घेणार लीप

डिया घर ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील घोटक, गधाप्रसाद, बाबूजी, कोमल, मयुरी यांसारख्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतात. आता या मालिकेत लीप घेतला जाणार आहे. 
एखाद्या रहस्यमय अथवा सास-बहूच्या मालिकेत लीप घेतला जात असल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. पण कॉमेडी मालिकेत लीप घेतली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
चिडिया घर या मालिकेत जवळजवळ सात-आठ वर्षांचा लीप घेतला जाणार असून लीपनंतर मालिकेत अनेक कलाकारांची एंट्री होणार आहे. तसेच गेली अनेक वर्षं आपल्याला या मालिकेतील सगळेच कलाकार एकाच लूकमध्ये पाहायला मिळत होते. आता लीपच्या निमित्ताने मालिकेतील सगळ्या कलाकारांचा मेकओव्हरदेखील होणार आहे. या लीपबद्दलची संपूर्ण कल्पना अद्याप कलाकारांनादेखील नाहीये. पण असे असले तरीही लीप घेतला जाणार आहे ही गोष्ट कळल्यानंतरच  ते खूप खूश झाले आहेत. आपले लूक काय असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिडिया घर या मालिकेची टीम त्यांच्या नव्या वेशभूषेत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. लीपनंतरच्या भागांचे चित्रीकरण जानेवारीत सुरू होणार असून फेब्रुवारीत प्रेक्षकांना लीपनंतरचे भाग पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतील गिल्लू आणि गज लीपनंतर मोठे झालेले पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना नव्या कलाकारांना पाहायला मिळणार आहे. तसेच लीपनंतर या मालिकेच्या कथानकालादेखील अनेक वळणे मिळणार आहेत. 
लीपनंतर मालिका पाहाताना प्रेक्षकांना त्यात एक फ्रेशनेस नक्कीच जाणवेल. 


Web Title: Lead to take home series of chidiya house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.