'#लय आवडतेस तू मला' उत्कंठावर्धक वळणावर, सरकारनं केलं सानिकाचं खास गृहप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:04 IST2025-02-11T17:04:20+5:302025-02-11T17:04:44+5:30
# Lai Aavdtes Tu Mala Serial : #लय आवडतेस तू मला मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळत आहेत.

'#लय आवडतेस तू मला' उत्कंठावर्धक वळणावर, सरकारनं केलं सानिकाचं खास गृहप्रवेश
कलर्स मराठीवरील '#लय आवडतेस तू मला' मालिकेत (# Lay Aavdtes Tu Mala Serial) अनेक ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळत आहेत. आप्पासाहेबांच्या सांगण्यावरून साखरगावात सानिका आली खरी पण तिची लढाई घराच्यांची असणार आहे हे तिला कमलने केलेल्या विरोधातून लक्षात आले. आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना सरकार - सानिका समोर अनेक आव्हान येत आहेत, अनेक विरोधांना सामोरं जावं लागतं आहे.
सानिकाच्या गृहप्रवेशादरम्यान साहेबराव बंदूक घेवून येतात आणि ते गोळी झाडतात. गोळी सानिकाऐवजी आप्पांना लागते. तिथून पोलीस साहेबरावांना पकडून घेवून जातात. आप्पांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. त्यात सई आगीत तेल ओतते आणि कमलला सांगते हे सगळं सानिकामुळे घडलंय. हे ऐकून आधीच चिडलेल्या कमलचा राग अनावर होतो आणि सरकारच्या नकळत कमल सानिकाला जायला सांगते. कमला सानिकाला सांगते तुझ्या सरकारच्या आयुष्यातून जाण्याने त्याचं आयुष्य सुखी होईल. सानिका जाण्याचा निर्णय घेते सरकारला हे सगळं कळताच तो सानिकाला घरी घेऊन येतो आणि तिचा स्वतः गृहप्रवेश करतो.
अप्पांना गोळी लागली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत म्हणून सगळे हॉस्पिटलमध्ये आहेत. तिथे सानिकासुद्धा आहे. साहेबरावांना पोलीस अटक करून घेऊन जातात. सई मिनलची १०० रुपयांची बेट लागते, सानिकाला कमल इथून हाकलवून लावेल यावर. सई कमलकडे जाते आणि कमलला पटवून देते कि सानिका किती आणि कशी पांढऱ्या पायची आहे. कमल भडकते, सरकारवर तुझ खरं प्रेम असेल, त्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स नसावेत असं जर तुला वाटत असेल तर त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा. हे ऐकल्यावर सानिकाला निघून जाण्याखेरीज ऑप्शनच राहत नाही. एकीकडे आप्पा साहेबरावांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तिथे सानिका अचानक सरकारला कळते. सरकार सानिकाला कसा शोधतो ? कसा तिला घरी परत आणतो ? कसा तिचा गृहप्रवेश करतो ? कमल कशी तयार होते ? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.