अखेर चेहरा आला समोर! कोण आहे ज्ञानदा रामतीर्थकरचा होणारा नवरा? मनोरंजनविश्वाशी आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:13 IST2025-12-23T18:09:43+5:302025-12-23T18:13:27+5:30
'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा पार पडला साखरपुडा; कोण आहे होणारा नवरा?

अखेर चेहरा आला समोर! कोण आहे ज्ञानदा रामतीर्थकरचा होणारा नवरा? मनोरंजनविश्वाशी आहे कनेक्शन
Dnyanada Ramtirthkar Engagement: सध्या मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी, भाग्यश्री न्हालवे यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर आहे. ज्ञानदाचा आज २३ डिसेंबरला साखरपुडा पार पडला आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली अप्पू अनेकांच्या पसंतीस उतरली. सध्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्या ही व्यक्तिरेखा साकारताना दिसते आहे. आजवर तिने मराठी मालिकांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अलिकडेच ज्ञानदाचा साखरपुडा संपन्न झाला. नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंवर चाहते आणि मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
कोण आहे अभिनेत्रीचा होणारा नवरा?
हर्षद आत्माराम असे या तरुणाचे नाव असून तो सिनेमॅटोग्राफर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हर्षद सिनेसृष्टीत सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांची खूप जुनी ओळख असल्याचं कळतंय. पारंपरिक पद्धतीने ज्ञानदा आणि हर्षदचा साखरपुडा पार पडला. यासाठी ज्ञानदा आणि हर्षदने खास लूक केला होता. ज्ञानदाने साखरपुड्यात सुंदर साडी परिधान केली होती.