'लागीर झालं जी'फेम 'हा' अभिनेता आहे शितलीचा खरा भाऊ; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 18:33 IST2023-08-31T18:32:45+5:302023-08-31T18:33:30+5:30

Shivani baokar: तुम्हाला माहितीये का मालिकेतील या बहीण-भावाच्या जोडीविषयी

lagir zal ji fame actress shivani baokar and nikhil chavan celebrate this rakshabandhan | 'लागीर झालं जी'फेम 'हा' अभिनेता आहे शितलीचा खरा भाऊ; तुम्हाला माहितीये का?

'लागीर झालं जी'फेम 'हा' अभिनेता आहे शितलीचा खरा भाऊ; तुम्हाला माहितीये का?

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे लागीरं झालं जी. एका सामान्य कुटुंबातील मुलाचा फौजी होण्याचा प्रवास या मालिकेत सुंदररित्या दाखवण्यात आला आहे. एकीकडे डोळ्यात फौजी व्हायचं स्वप्न ते या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी त्याला साथ देणारी प्रेयसी अशी सुंदर कथा या मालिकेत पाहायला मिळाली. त्यामुळे ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकराचं एकमेकांसोबत छान बॉण्डिंग आहे. हे बॉण्डिंग वेळोवेळी त्यांच्यात पाहायला मिळतं.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील दोन कलाकारांचा फोटो व्हायरल होत आहे. या दोन्ही कलाकारांनी मालिकेत मानलेल्या बहीण-भावाची भूमिका साकारली असून खऱ्या आयुष्यातदेखील ही जोडी एकमेकांचे बहीण-भाऊ आहेत. अलिकडेच या जोडीने त्यांचं रक्षाबंधन साजरं केलं. या रक्षाबंधनाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ही कलाकाराची जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता निखिल चव्हाण.  लागीरं झालं जी या मालिकेत शिवानीने शितली ही भूमिका साकारली होती. तर, निखिलने विक्रम राऊत ही भूमिका साकारली होती. या मालिकेत विक्रमने शितलीला बहीण मानलं होतं. त्यामुळे या बहीण-भावाची जोडी मालिकेत प्रचंड गाजली होती. इतकंच नाही तर खऱ्या आयुष्यातदेखील हे दोघं एकमेकांचे भावंड आहेत. 

दरम्यान, खऱ्या आयुष्यात निखिल आणि शिवानी एकमेकांचे सख्खे भाऊ-बहीण नसले तरी सुद्धा ते एकमेकांचे मानलेले भावंडं आहेत. निखिल शिवानीला त्याची लहान बहीण मानतो. त्यामुळे दरवर्षी ही जोडी रक्षाबंधन, भाऊबीज हे सण साजरे करतात. अलिकडेच त्यांनी रक्षाबंधन साजरं केलं असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 

Web Title: lagir zal ji fame actress shivani baokar and nikhil chavan celebrate this rakshabandhan