प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील धाकट्या भावावर प्रेम, जाहीर कबुली देत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:19 IST2025-11-12T14:18:16+5:302025-11-12T14:19:25+5:30
'क्योंकि सास भी कभी बहू थी २' फेम अभिनेत्री ऑन-स्क्रीन धाकट्या भावाची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील धाकट्या भावावर प्रेम, जाहीर कबुली देत म्हणाली...
Shagun Sharma Dating On Screen Brother Aman Gandhi : 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' ही लोकप्रिय मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत 'परी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शगुन शर्मा (Shagun Sharma) हिने सध्या सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. तिनं तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानं तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. कारण, मालिकेतील आपल्या नकारात्मक भूमिकेमुळे चर्चेत असलेली शगुन ही खऱ्या आयुष्यात तिच्याच ऑन-स्क्रीन धाकट्या भावाची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे.
'क्योंकि सास भी कभी बहू थी २' मध्ये शगुन शर्मा 'परी'ची भूमिका साकारत आहे. याच मालिकेत तिचा ऑन-स्क्रीन धाकटा भाऊ ऋतिक याची भूमिका अभिनेता अमन गांधी (Aman Gandhi) साकारत आहे. जो पडद्यावर तिचा धाकटा भाऊ आहे. त्यालाच ती खऱ्या आयुष्यात डेट करत आहे. अलीकडेच हॉटरफ्लाय (Hauterfly) ला दिलेल्या एका खास मुलाखतीत शगुन शर्माने याबद्दल उघडपणे चर्चा केली. तिने अमन गांधीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले की, "या अफवा नाहीत, हे खरं आहे. पण, आम्ही मालिकेत काम सुरू केल्यावर डेटिंग करायला सुरुवात केली नव्हती. आम्ही त्याआधीपासून एकत्र होतो".
शगुनआधी अमन गांधीची 'क्योंकि सास भी कभी बहू थी २'मधील ऋतिक विरानीच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. त्यानंतर शगुनला तिच मालिका ऑफर झाली. शगुनने ऑफर आल्यावर पहिल्यांदा अमनशी याबद्दल चर्चा केली आणि नंतर ती ऑफर स्वीकारली होती. खऱ्या आयुष्यात बॉयफ्रेंड असलेला अमन शोमध्ये तिच्या भावाची भूमिका साकारण्यास तयार आहे की नाही, असं तिने अमनला विचारलं होतं.
दरम्यान, सुरुवातीला सेटवर कोणालाही अभिनेत्री शगुन शर्मा आणि अभिनेता अमन गांधीच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीही चर्चा केली नव्हती. मात्र, दोन महिन्यांनंतर या जोडप्याने स्वतःच सर्वांसमोर आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं.