कुशल पंजाबीच्या आत्महत्येने खळबळ; 4 वर्षांपूर्वी युरोपियन गर्लफ्रेन्डसोबत केले होते लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:22 IST2019-12-27T11:45:17+5:302019-12-27T13:22:03+5:30

कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

kushal punjabi death unknown facts marriage fitness freak about kushal | कुशल पंजाबीच्या आत्महत्येने खळबळ; 4 वर्षांपूर्वी युरोपियन गर्लफ्रेन्डसोबत केले होते लग्न 

कुशल पंजाबीच्या आत्महत्येने खळबळ; 4 वर्षांपूर्वी युरोपियन गर्लफ्रेन्डसोबत केले होते लग्न 

ठळक मुद्देत्याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, अंदाज, सलाम-ए-इश्क अशा अनेक शोमध्ये काम केले.

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुशलने आत्महत्या का केली, हे अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी त्याच्यासारख्या मनमौजी अभिनेत्याने आत्महत्या करावी, यावर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नाहीये.


कुशल एक शानदार अभिनेता होताच. शिवाय कुटुंबावर प्रेम करणारा पती, पिता आणि एक जिंदादील व्यक्ती होता. ‘जोर का झटका- टोटल वाइपआऊट’ हा रिअ‍ॅलिटी गेम शो त्याने जिंकला होता. बक्षिसाच्या रकमेपोटी त्याला 50 लाख रूपये जिंकली होते. अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही त्याने काम केले.


कुशल सिंधी कुटुंबात जन्मला होता. लहानपणापासून त्याला सायकलिंग, स्केटिंग, स्वीमिंग, डान्सिंगची आवड होती. अ‍ॅडवेंचर्स स्पोर्ट  म्हणजे त्याचा जीव की प्राण होता.


एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच जॅज आणि हिप हॉप डान्स फॉर्ममध्ये तो एक्सपर्ट होता. ट्रॅव्हलिंग आणि आऊटडोर स्पोर्टची त्याला प्रचंड आवड होती.


नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले होते. या लग्नाला अतिशय जवळचे लोक उपस्थित होते. गोव्यात हे लग्न झाले होते. दोघांनाही एक मुलगा आहे.

कुशलचा मुलावर प्रचंड जीव होता. त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट बघितल्यावर तो मुलावर किती प्रेम करायचा, याचा अंदाज येतो. मुलासोबत त्याचे शानदार बॉन्डिंग होते.


कुशल फिटनेस फ्रिक होता. इन्स्टा अकाऊंटवर तो सर्रास जिममधील फोटो शेअर करायचा. त्याच्या टोन्ड बॉडीचे अनेक चाहते होते.


त्याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, अंदाज, सलाम-ए-इश्क अशा अनेक शोमध्ये काम केले. ‘इश्क में मरजावां’ या मालिकेत तो अखेरचा झळकला. काही चित्रपटांतही त्याने काम केले.

Web Title: kushal punjabi death unknown facts marriage fitness freak about kushal