Video: पेटत्या होळीतून कुशल बद्रिकेच्या बायकोने काढला नारळ! अभिनेता म्हणाला, "खोड्या सुटत नाहीत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 11:37 IST2024-03-25T11:36:49+5:302024-03-25T11:37:59+5:30

'चला हवा येऊ द्या' लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेने बायकोचा खास व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओ शेअर करताना कुशलने बायकोबद्दल खास पोस्टही लिहीली आहे.

Kushal Badrike wife removed a coconut from the burning Holi video viral | Video: पेटत्या होळीतून कुशल बद्रिकेच्या बायकोने काढला नारळ! अभिनेता म्हणाला, "खोड्या सुटत नाहीत.."

Video: पेटत्या होळीतून कुशल बद्रिकेच्या बायकोने काढला नारळ! अभिनेता म्हणाला, "खोड्या सुटत नाहीत.."

केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात होळी-रंगपंचमीचा उत्साह आहे. आज सर्वजण होळी - रंगपंचमीचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही होळीचा जल्लोष साजरा करत आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेच्या बायकोने पेटत्या होळीसमोर एक खास गोष्ट केलीय, त्यामुळे सर्वांनी तिचं कौतुक केलंय. कुशलनेही बायकोचा व्हिडीओ पोस्ट करुन पोस्ट लिहिलीय.

कुशलची पत्नी सुनैनाने पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढलाय. सुनैनाने न घाबरता उत्साहात पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढण्याची साहसी कामगिरी केलीय. बायकोचा व्हिडीओ शेअर करत कुशल लिहीतो, "पेटत्या होळीतला नारळ काढायचा आणि प्रसाद म्हणून खायचा. बालपणापासूनच्या खोड्या ! बालपण मागे सुटत जातं, खोड्या सुटत नाहीत."

कुशलच्या चाहत्यांनी त्याच्या बायकोचं खास कौतुक केलंय. कुशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमध्ये काम करत होता. पण सध्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. कुशल सध्या हेमांगी कवीसोबत 'मॅडनेस मचाएंंगे' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. हा शो सोनी टीव्हीवर रात्री ९.३० वाजता पाहायला मिळेल.

Web Title: Kushal Badrike wife removed a coconut from the burning Holi video viral