बायकोच्या वाढदिवशी कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट, म्हणाला- "एक राक्षस माझ्या घरी राहतो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:52 IST2026-01-14T10:52:26+5:302026-01-14T10:52:45+5:30
कुशल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. कुशलच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात. कुशलची पत्नी सुनैयनाचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर केली आहे.

बायकोच्या वाढदिवशी कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट, म्हणाला- "एक राक्षस माझ्या घरी राहतो..."
कुशल बद्रिके हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. 'चला हवा येऊ द्या' मधून कुशलला प्रसिद्धी मिळाली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. कुशलच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात. कुशलची पत्नी सुनैयनाचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर केली आहे.
कुशलने पत्नीचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने पोस्टही लिहिली आहे. तो म्हणतो, "तुम्ही गुहेतल्या राक्षसाची गोष्ट ऐकली आहे का? एक राक्षस असतो, तो फक्त खाण्यापुरता गुहेतून बाहेर येतो आणि पोट भरलं की पुन्हा गुहेत जाऊन झोपतो. तो राक्षस माझ्या घरी राहतो आणि त्याने माझ्या बेडरूमची गुहा करून ठेवली आहे. तो राक्षस उंचीने थोडा कमी असला तरी घरात त्याची खूप दहशत आहे. त्या राक्षसाचे कान एवढे तीक्ष्ण आहेत की मी गॅलरीमध्ये हळू आवाजात जरी फोनवर बोलत असलो, तरी त्याला पार किचनपर्यंत सगळं ऐकू येतं. नुसत्या कीपॅडच्या आवाजाने त्याला मी टाइप करत असलेले मेसेज कळतात".
"हा राक्षस मधल्या काळात डिटेक्टिव्ह असावा. घरात एखादा वेगळा परफ्यूमचा वास आला किंवा एखादा पडलेला केस दिसला, तर घरात कोण येऊन गेलं हे तो क्षणात सांगतो. त्या राक्षसला नाचाची फार आवड आहे. तो कधी कधी स्टेजवर नाचतो; बाकी वेळ माझ्या डोक्यावर थयथयाट करतो. आज त्याचा वाढदिवस आहे. अरेऽऽऽ, किती हा योगायोग !! आज तर माझ्या बायकोचाही वाढदिवस आहे. Happy Birthday, सुनयन", असं म्हणत त्याने मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.